आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन तरूणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

संतोष पाटील 
Monday, 30 November 2020

आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन एका तरूणाने गेल्या दोन महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. माढा तालुक्‍यातील वरवडे गावच्या हद्दीतील ज्वारीच्या शेतात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी संबंधित तरूणाविरूध्द टेंभुर्णी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी या तरूणास अटक करून बार्शी येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

टेंभुर्णी (सोलापूर) : आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन एका तरूणाने गेल्या दोन महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. माढा तालुक्‍यातील वरवडे गावच्या हद्दीतील ज्वारीच्या शेतात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी संबंधित तरूणाविरूध्द टेंभुर्णी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी या तरूणास अटक करून बार्शी येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
याप्रकरणी योगेश पांडुरंग कदम (वय 25, रा. आहेरगांव, ता. माढा, जि. सोलापूर) यास अटक केली आहे. याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, गेल्या दोन महिन्यांपूर्वी वरवडे येथील एका अल्पवयीन मुलीची योगेश कदम यांनी ओळख करून स्वतःचा मोबाईल नंबर मुलीला दिला व फोन करण्यास सांगितले. त्यानंतर मुलीने फोन केला असता मुलीला त्याने घराजवळच्या शेतात बोलावून घेतले. मुलगी तेथे गेल्यानंतर गोड बोलून मुलीशी झोंबाझोंब करू लागला. तेव्हा मुलीने त्यास विरोध केला असता त्याने आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. रविवारी (ता. 29) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ज्वारीच्या शेतात विरोध करीत असताना देखील पुन्हा अत्याचार केला. ज्वारीच्या शेतातून मुलगी बाहेर येत असताना तिचा भाऊ तेथे आला. त्याने तिला धीर देऊन घरी नेले. यानंतर मुलीने आई-वडिलांना झालेला प्रकार सांगितला. नंतर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने संबंधित तरूणाविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे व त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने यातील संशतिय आरोपी योगेश कदम यास ताब्यात घेऊन अटक केली. आज दुपारी बार्शी येथील विशेष न्यायालयासमोर त्यास हजर केले असता आरोपीस बुधवार (ता. 2)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे हे करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torture of a young woman by threatening to kill her parents