सोलापुरात आज मंगळवारी एक मृत्यूसह 13  कोरोनाबाधित, एकुण पॅाझिटीव्ह 621

सोलापुरात आज मंगळवारी एक मृत्यूसह 13  कोरोनाबाधित, एकुण पॅाझिटीव्ह 621

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने आज मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रसिद्ध केल्यानुसार गेल्या बारा तासांत सोलापुरात 13 कोरोनाबाधित रुग्ण वाढले. बाधित रुग्णांमध्ये नऊ पुरुष आणि चार स्त्रियांचा आहे. मृतामध्ये एक पुरुषाचा समावेश आहे. 

गेल्या बारा तासात एकूण 105 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 13 अहवाल पॅाझिटीव्ह, तर 92 निगेटीव्ह आले. आतापर्यंत5844 अहवालांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी621 इतके पाॅझिटीव्ह तर5223इतके निगेटीव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 59 रुग्ण मरण पावले आहेत, तर277 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत घरी गेले आहेत. सोलापुरात पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे, त्याप्रमाणे बरे होऊन परतणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com