Gram Panchayat Results : तुळशीदासनगरवर सर्वपक्षीय पाच गटांचे वर्चस्व ! एकाच कुटुंबातील चार सदस्य चित; आई विजयी, मुलगा पराभूत 

Tulshidasnagar
Tulshidasnagar

वैराग (सोलापूर) : तुळशीदासनगर ग्रामपंचायतीवर सर्वपक्षीय पाच पुढाऱ्यांची सत्ता स्थापन झाली आहे. येथील लढत आगळी - वेगळी व चर्चेची झालेली होती. एकाच कुटुंबातील चार उमेदवार पराभूत तर आई विजयी व मुलगा पराभूत झाल्याने ही निवडणूक तालुक्‍यात चर्चेची व लक्षवेधी ठरली. 

तीन वॉर्डांतून सात जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. माजी सरपंच पुष्पा कोळेकर यांच्या कुटुंबातील चार सदस्य निवडणूक मैदानात होते. मात्र एकही उमेदवार विजयाचा गुलाल उधळू शकला नाही. येथे दुरंगी अटीतटीची लढत होती. विजयी झालेल्या गटात राऊत, सोपल, भूमकर, निंबाळकर, मिरगणे या पाच पुढाऱ्यांचे समर्थक असलेले सात सदस्य निवडून आले. त्यात सासू छाया पाटील व सून सुनीता पाटील या दोघी विजयी झाल्या आहेत. तर याच गटातून आई उषा चांगदेव उबाळे या विजयी झाल्या तर मुलगा विजय उबाळे हा पराभूत झाला आहे. 

विजयी झालेले उमेदवार : संतोष नागनाथ राक्षे, सुनीता अभिजित पाटील, छाया बाबासाहेब पाटील, दत्तात्रय रामकृष्ण थोरात, मोहन ज्ञानदेव मुळे, लक्ष्मी विकास सोलनकर, उषा चांगदेव उबाळे हे सर्वपक्षीय पाच गटांचे सात सदस्य विजयी झाले आहेत. विरोधी गटाचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. त्यामुळे तुळशीदासनगर ग्रामपंचायत निवडणूक ही बार्शी तालुक्‍यात आगळी - वेगळी व खुमासदार चर्चेची ठरली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com