राष्ट्रीय महामार्गावर चारचाकीची पंक्‍चर काढताना दोघे ठार ! वर्षापूर्वी विवाह झालेल्या शिक्षकाचाही समावेश 

तात्या लांडगे
Monday, 9 November 2020

वर्षापूर्वीच संजयचा झाला होता विवाह 
सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर (रविवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. अपघात मृत झालेल्यापैकी संयज विठोबा अभंगे हे मंगळवेढ्यातील एका शाळेत शिक्षक होते. त्यांचा वर्षापूर्वीच विवाह झाला होता. मृत सारंग प्रकाश रणदिवे हेही विवाहित असून त्यांना एक मुलगी असल्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. मंद्रूपकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.  

सोलापूर : सोलापुरातून गावी निघाल्यानंतर बाळे- शिवाजी नगर परिसरातील मनोरमा हॉटेलसमोर चारचाकी (एमएच- 13, एझेड- 7234) पंक्‍चर झाली. त्यानंतर सारंग प्रकाश रणदिवे व संजय विठोबा अभंगे (रा. तुंगत, ता. पंढरपूर) हे दोघेही खाली उतरले. त्यांनी पंक्‍चर काढायला सुरवात केली, मात्र काही वेळाने मागून आलेल्या कंन्टेनरने (सीजी- 04, एमपी- 1457) कारला जोरात धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

 

वर्षापूर्वीच संजयचा झाला होता विवाह 
सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर (रविवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. अपघात मृत झालेल्यापैकी संयज विठोबा अभंगे हे मंगळवेढ्यातील एका शाळेत शिक्षक होते. त्यांचा वर्षापूर्वीच विवाह झाला होता. मृत सारंग प्रकाश रणदिवे हेही विवाहित असून त्यांना एक मुलगी असल्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. मंद्रूपकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.  

 

अपघातानंतर दोघांनाही श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तत्पूर्वी, चारचाकी पंक्‍चर झाल्यानंतर मृतांनी त्यांचे वाहन दुभाजकालगत उभे केले होते. त्यांनी पंक्‍चर काढण्यापूर्वी वाहनाचे मागचे दिवे लावून काही अंतरावर दगडही ठेवले होते. मात्र, ओव्हरटेक करताना कंन्टेनर चालकाला समोर थांबलेली चारचाकी दिसलीच नाही. कंन्टेनर चालकाने धडक हुकविण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या बाजूला ते दोघे थांबले होते त्यांनाच उडविले. अपघातानंतर फौजदार चावडी पोलिस अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहचले. दरम्यान, कंन्टेनरचालक उमेश विनायक राठोड (रा. हगलूर, ता. तुळजापूर) पसार झाला होता. मात्र, तो तिथून पळून पोलिस ठाण्यात हजर झाला होता, त्यांच्याविरुध्द हयगयीने वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. या घटनेचा तपास फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन मंद्रूपकर हे करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed while puncturing four-wheeler on National Highway Including a teacher who got married a year ago