दक्षिण मध्य रेल्वेच्या दोन गाड्या सोलापूर विभागातून धावणार 

railway.jpg
railway.jpg

सोलापूरः दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधासाठी गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (ता.7 ) ते बुधवार (ता.16) या कालावधीत या गाड्या धावणार आहेत. 

गाडी (क्र. 56904/56903) धारवाड-सोलापूर-धारवाड पैंसेजरच्या व गाडी क्र.( 07322/07321) धारवाड-सोलापूर-धारवाड विशेष एक्‍सप्रेस धावणार आहेत. गाडी क्र. (56904/56903) धारवाड-सोलापूर-धारवाड पैसेजरच्या थांब्या व्यतिरिक्त अंकल, नवलूर, मिंचनल, निंबाळ आणि तडवळ स्थानकावर गाडी थांबणार आहे. गाडी (क्र. 07322)धारवाड-सोलापूर विशेष एक्‍सप्रेस सोमवार (ता. 7) पासून धावेल. गाडी (क्र. 07321) सोलापूर-धारवाड विशेष एक्‍सप्रेस मंगळवार (ता.8) पासून गुरुवार (ता.17) या कालावधीत धावेल. या गाड्यामध्ये 1 स्लिपर, आठ जनरल डबे व दोन ब्रेकयान असतील. या प्रमाणे एकूण 11 डबे असणार आहेत. 

सोमवार (ता.7) पासून ते बुधवार (ता.16) 16.12.2020 दरम्यान गाडी क्र. 56906/56905 हुबळी-सोलापूर-हुबळी पैंसेजरच्या थांबा आणि वेळानुसार गाडी क्र. 07332/07331 हुबळी-सोलापूर-हुबळी विशेष एक्‍सप्रेस धावले. 
गाडी (क्र. 07332) हुबळी- सोलापूर विशेष एक्‍सप्रेस सोमवार (ता.7) पासून बुधवार (ता. 16) या कालवधीत धावेल. गाडी (क्र. 07331) सोलापूर-हुबळी विशेष एक्‍सप्रेस मंगळवार (ता.8) ते गुरुवार (ता.17) या कालावधीत धावेल. या गाड्यांना एक स्लिपर डबा, आठ जनरल डबे व दोन ब्रेकयान या प्रमाणे एकूण अकरा डबे असतील. 
कोविड-19 संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. कोविड-19 शी निगडीत इतर सर्व खबरदारी देखील सुनिश्‍चित केल्या जातील. वरिल गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील असे रेल्वे खात्याने कळवले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com