उध्दव ठाकरे... खेड्यात हातातला घास टाकून तुम्हाला ऐकतायेत..!

Uddhav Thackeray is growing in popularity
Uddhav Thackeray is growing in popularity

सोलापूर : सध्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार वेगवेळ्या उपाययोना करत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे लोकांच्या मनात भिती आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या नागरिकांना धीर देण्याचे काम करत आहेत. ‘न दिसणाऱ्या शत्रुबरोबर सुरु असलेली ही लढाई आपण जिंकणारच’ असा विश्‍वास देतानाच नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे आतिशय नम्रपणे सांगत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांची लोकप्रियता वाढत आहे. शिवाय त्यांच्यावरचा विश्‍वासही वाढत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. उद्धव ठाकरे काय बोलत आहेत, हे ऐकण्यासाठी अक्षरश: हातातले काम सोडून महिला ऐकत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21; सारीचे आढळले दोन रुग्ण 
कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वांचीच चिंता वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागात यामुळे भितीचे वातावरण निमार्ण झाले आहे. एकही रुग्ण नसलेल्या सोलापुरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या रविवारी म्हणजे १२ एप्रिलला एक रुग्ण होता. त्याची संख्या आता २१ झाली आहे. पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधीत असल्याचे चाचणीत समोर आले होते. त्यानंतर रुग्णांची संख्या एकने वाढली. पुढे त्यात १० ची भर पडली. अशीच संख्या वाढून आज ती २१ वर गेली आहे. याची धास्ती नागरिक घेत आहेत. प्रशासनाने संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री ठाकरे हे ‘मी’ नव्हे तर ‘आपण’ असा उल्लेख करतात. त्यामुळे आपल्याच कुटूंबातील कोणतरी सदस्य बोलत असल्याचे वाटते असं नागरिक सांगत आहेत. ते आपल्यासाठीच बोलतात, ते सांगतात ते ऐकायचे असा निश्‍चयही ते करत आहेत.
सुनिता मुरुमकर- वाळुंजकर म्हणाल्या, कोरोनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुकवरुन नागरिकांशी संवाद साधतात. ते काय सांगतील हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुकत असतोत. सर्वांना विश्‍वासात घेऊन ते मनोगत व्यक्त करतात. कोरोनाची अनेकांच्या मनात भिती आहे. मात्र, त्यांच्या आशादायक वक्तव्याने अनेकांना धीर मिळतो. कोणताही आव न आणता ते बोलतात. सर्वसामान्य नागरिकांचा यामध्ये आवर्जुन ते उल्लेख करतात. 
हेही वाचा : दहावीच्या निकालाबाबत ब्रेकिंग ! शिक्षणमंत्री म्हणाल्या निकाल... 
प्रेमा रोकडे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील नागरिकांसी जीव तोडून सांगत आहेत. अरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी त्यांना साथ देण्याची गरज आहे. राज्याचा प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे अतिशय चांगले काम करत आहेत. लोकांच्या मनामध्ये प्रचंड भिती असताना ते धीर देण्याचे काम करत आहेत. जे वास्तव आहे, ते सांगत आहेत. कोणीही राजकारण न करता त्यांच्या आवाहनाला घरातच बसून पाठिंबा देण्याची गरज आहे. त्या जे सूचना देत आहेत. त्याचा अवलंब करुन नागरिकांनी घरातच बसणे आवश्‍यक आहे. ठाकरे सांगत असल्याप्रमाणे ‘हेही नक्कीच दिवस जातील असं वाटतंय’.
वैजंता मुरुमकर म्हणाले, आमच्या घरात टीव्ही नाही, पण मुलं त्यांचं भाषण मोबाईलमध्ये दाखवतात. ते अवर्जुन मी एकेते. त्यातून धीर मिळतो. ते कधीच मीपणा आणत नाहीत. आपल्यासाठीच ते बोलत आहेत. महिलांची सुद्धा ते काळजी घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com