`या`शहराची पाणीपुरठा योजना दोन टप्प्यांत

`या`शहराची पाणीपुरठा योजना दोन टप्प्यांत

सोलापूर  : सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व सक्षम होण्यासाठी उजनी जलाशय परिसरात पंपहाऊस आणि जॅकवेल उभारण्यात यावे. त्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने 0.25 एकर जागा तातडीने महापालिकेस उपलब्ध करून द्यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिले. 

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात आज मंगळवारी मंत्रालयात आयोजिलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मनोज सैनिक, देवाशिष चक्रवर्ती, विभागाचे मुख्य सचिव डाॅ. संजय चहांदे, वनविभागाचे सचिव वेणुगाेपाल रेड्डी, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. 

उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी या संबंधित यंत्रणांनी येत्या पंधरवड्यात 110 किलोमीटरचे सीमांकन करावे. पाणीपुरवठा योजनेसाठी शासन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल. उजनी जलाशय पंपहाऊस व जॅकवेल उभारण्यासाठीची जागा तातडीने महापालिकेस देण्याची सूचनाही श्री. पवार यांनी केली. 

या योजनेसाठी भूमीगत जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यावेळी शेतकर्यांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. शेतकर्यांना नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी, असेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. ही योजना दोन टप्प्यांत राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 110 दशलक्षलिटर क्षमतेची जलवाहिनी टाकली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वितरण व्यवस्था सुधारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 464 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com