मेथिलीन ब्लू औषधाचे कोरोना उपचारात मिळताहेत अस्थिर परिणाम 

corona treatment.jpg
corona treatment.jpg

सोलापूरः कोरोना उपचारामध्ये पुर्वीच्या टसले झुम्यांब, इटोलिक झुम्यांब सारख्या औषधानंतर चौथे महत्वाचे औषध म्हणून मेथिलीन ब्ल्यू या औषधांचा वापर अनेक रुग्णालयामध्ये केला जाऊ लागला आहे. मात्र अजूनही या उपचाराचे परिणाम काही रुग्णांसाठी अधिक चांगले तर काही साठी ते अत्यंत कमी परिणामकारक असल्याचे दिसून येत आहेत. 

शहरातील अनेक रुग्णालयामध्ये यापुर्वी पासून कोरोना रुग्णांच्या उपचारात अनेक औषधी लाक्षणीक स्थितीवर वापरली जात आहेत. पुर्वीची टसलेझुम्यांब, हिपॅरिन सारखी अनेक औषधी वापरली जात आहेत. त्यामध्ये आता मेथिलीन ब्ल्यू या औषधाची भर पडली आहे. या औषधाचा उपयोग पुर्वीपासून श्‍वसनाच्या संसर्गासाठी केला जात होता. त्यानंतर आता कोरोना उपचारामध्ये श्‍वसनाच्या संदर्भात जी लाक्षणीक स्थिती तयार होते. त्यामध्ये फुफ्फुसावर निर्माण होणाऱ्या गुठळ्या व सुज या लक्षणांची तिव्रता कमी करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग केला जात आहे. या औषधाचे इंजेक्‍शन रुग्णाच्या शिरेतून दिले जाते. 

सध्या रुग्णालयामध्ये या औषधाचा उपयोग कोरोना रुग्णांची लक्षणे पाहून केला जात आहे. सोलापूर शहरात अनेक प्रकारच्या रुग्णांच्या उपचारामध्ये या इंजेक्‍शनचा उपयोग केला गेला. एमसीएन (मेथिलीन ब्लू, व्हिटॅमीन सी व ऍसिटील सिस्टीन) या स्वरुपात देखील त्याचा उपयोग केला जात आहे. तेव्हा काही रुग्णांच्या उपचारात त्याचे परिणाम खुपच अधिक चांगले दिसुन आले आहेत. तर काही रुग्णांच्या बाबतीत परिणामकारकता मिळत नसल्याचे दिसून आले आहे. या परिणामांच्या वैविध्याबद्दल सध्या उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या स्थितीत लाक्षणिक उपाययोजनावर उपचाराचा भर असल्याने मेथिलीन ब्लू चे परिणाम अधिक चांगले मिळण्याच्या दृष्टीने होत असलेल्या काही संशोधनात्मक कामाकडे डॉक्‍टरांचे लक्ष वेधले गेले आहे. 

परिणामाकडे डॉक्‍टरांचे लक्ष 
रुग्णालयामध्ये मेथिलीन ब्लू या औषधाचा उपयोग कोरोना उपचारात केला जात आहे. फुफ्फूसांच्या काही लक्षणांची तिव्रता कमी करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग केला जातो. उपचारामध्ये या औषधांचा परिणामांचा अंदाज अजूनपणे निश्‍चित होत नाही. 
- डॉ. सुदीप सारडा, अध्यक्ष, हॉस्पिटल असोसिएशन, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com