रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या खाणे गरजेचे

Vegetable Festival from Agriculture Department in Karmala taluka
Vegetable Festival from Agriculture Department in Karmala taluka

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र सरकारचा कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरावर रानभाजी महोत्सव घेण्यात आला.

पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे म्हणाले, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या खाणे गरजेचे आहे. पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे म्हणाले, वर्षातून एकदाच ते पण विशेषतः पावसाळ्यात मिळणाऱ्या या रानभाज्या म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. विशिष्ट परिस्थितीत अनुकूल वातावरणात नैसर्गिकरीत्या येणाऱ्या या भाज्या आरोग्यदायी आहेत.

विविध जुनाट आजारांवर तथा दुर्धर आजारांवर रामबाण इलाज आहे. यातील विविध घटक व ॲन्टी ऑक्सीडंटस् मानवी शरीराला किफातशीर आहेत. या भाज्यांच्या संवर्धनासाठी आपण अविरत प्रयत्न करून त्यांचा मूळ अधिवास जतन व संरक्षित करणे गरजेचे आहे.

भाजपचे गणेश चिवटे, करमाळा नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वीणा पवार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रानभाजी

महोत्सवामध्ये प्रदर्शित केलेल्या रानभाज्यांचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये तालुकयातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रानभाज्याची विक्री केली. करमाळा शहर व परीसरातील ग्राहकांनी या रानभाज्या खरेदी करून उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी सुरज पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अजयकुमार बागल यांनी मानले.
 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com