पीएमपीएल क्रिकेट स्पर्धेत विजय फायटर्स अजिंक्‍य 

pmpl spardha.jpg
pmpl spardha.jpg

सोलापूर ः सोलापुरातील डोणगाव रोड येथील पुष्प जिमखाना मैदानावर पार पडलेल्या एक दिवसीय पीएमपीएल क्रिकेट स्पर्धेत विजय फायटर्स संघाने माऊली मास्टर्स वर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. 

पीएम ग्रुपमधीलच अनिल गायकवाड यांचा एजी वारियर्स, दीपक गवळी यांचा डीजी चॅम्पियन्स, विजय कोनापुरे यांचा विजय फायटर्स आणि मुकुंद वाघमारे यांचा माऊली मास्टर्स इत्यादी चार संघाचा सहभाग होता.अंतिम सामना माऊली मास्टर्स आणि विजय फायटर्स यांच्या दरम्यान झाला. 
प्रथम फलंदाजी करताना विजय फायटर संघाने इम्रान शेख यांच्या तडफदार अर्धशतकाच्या जोरावर आठ षटकात 84 धावा पटकाविल्या. प्रत्युत्तरादाखल माऊली मास्टर्सला फक्त 55 करता आल्या. अमोल देशपांडे यांने 21 धावा पटकाविल्या. 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलापुरातील भाजपा नेते माजी नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोरक चौधरी, अमित रोडगे, राजू राठोड, श्रीशैल कुताटे, गौरीशंकर बाळशेट्टी, परमेश्‍वर माळगे यांची उपस्थिती होती. 
वैयक्तिक पारितोषिक पुढील प्रमाणे देण्यात आली. मालिका वीर सज्जाद जिल्ला, उत्कृष्ट फलंदाज लक्ष्मण कावळे, उत्कृष्ट गोलंदाज अमित गिराम, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुंडलिक बनसोडे, उत्कृष्ट यष्टीरक्षक अमोल देशपांडे यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेसाठी शेखर कदम, सनी कीर्तने, आप्पा रामदासी, काशिनाथ औरसंग, धर्मराज नाशि, दिनेश कोळेकर, रमेश बटनुरे, तांदळे सर, प्रशांत गुमटे, शेखर कदम, सदांनद कोकडे, रूतु मुस्के, सौरभ पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वीरभद्र कोळी यांनी केले. आभार पवन गायकवाड यांनी मानले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com