राजुरी गावात कार्यान्वित झाली ग्रामसुरक्षा यंत्रणा 

राजाराम माने 
Monday, 31 August 2020

ग्रामसुरक्षा यंत्रणेने एक ऍप सुरू केले असून, याद्वार रेशन, रॉकेल, ग्रामपंचायतमधील सरकारी योजना, ग्रामसभा, सरकारी कार्यालयांकडून दिली जाणारी माहिती तसेच गावामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चोरी, दरोडा, आग लागणे, लहान मुले हरवणे, महिलांची छेडछाड, दागिने चोरीला जाणे, दुकान फोडणे, बिबट्याचा हल्ला, विषारी सर्पदंश, पिसाळलेला कुत्रा गावांमध्ये येणे, निधन वार्ता आदी घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा जास्तीत जास्त वापर करून चोरी, दरोडा आदी घटनांवर आपण आळा घालू शकतो. 

केत्तूर (सोलापूर) : राजुरी (ता. करमाळा) गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी दिली. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गावातील विविध कामे होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

यंत्रणेने एक ऍप विकसित केले असून, याद्वारे रेशन, रॉकेल, ग्रामपंचायतमधील सरकारी योजना, ग्रामसभा, सरकारी कार्यालयांकडून दिली जाणारी माहिती तसेच गावामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चोरी, दरोडा, आग लागणे, लहान मुले हरवणे, महिलांची छेडछाड, दागिने चोरीला जाणे, दुकान फोडणे, बिबट्याचा हल्ला, विषारी सर्पदंश, पिसाळलेला कुत्रा गावांमध्ये येणे, निधन वार्ता आदी घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा जास्तीत जास्त वापर करून चोरी, दरोडा आदी घटनांवर आपण आळा घालू शकतो. 

हे ऍप ऍक्‍टिव्ह करून गावातील प्रत्येकाचे मोबाईल नंबर सामील करण्यात आले आहेत. ज्या वेळी आपत्तीजनक परिस्थितीमध्ये एकाच वेळी 18002703600 या नंबरवर कॉल केला असता गावातील सर्वांना तसेच करमाळा पोलिस ठाण्याला कॉल जाऊन मदत मिळू शकते. यामुळे अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत मिळणे सोपे जाईल. परंतु या कॉलचा गैरवापर केला असता त्या व्यक्तीवर पोलिस ठाण्यातून गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवणे आता ग्रामपंचायतीला सोपे जाईल. त्यामुळे ज्यांचे मोबाईल नंबर अजून ऍड केले नाहीत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा. ही योजना यशस्वी होण्यासाठी राजुरीचे सुपुत्र तथा इंदापूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर व करमाळा पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village security system was started in Rajuri village in Karmala taluka