परिस्थितीशी झगडणाऱ्या 'बालाजी'साठी वालचंद कॉलेज बनले किंगमेकर !

balaji dyavanpalli new.jpg
balaji dyavanpalli new.jpg

सोलापूर ः स्वाभिमान गहाण ठेवल्या शिवाय गरीबीला मार्ग सापडत नाही, अशी अनेक उदाहरणे समाजात दिसून येतात. थोड्याफार फरकाने हे सत्य नाकारता येत नाही. अगदी त्या उलटची सुखद घटना म्हणजे होतकरु विद्यार्थ्याची प्रतिकूल परिस्थिती समजून घेऊन त्याची सर्वोतोपरी काळजी घेत त्याला इन्फोसिस कंपनी मध्ये आकर्षक पॅकेजची नोकरी मिळवून देण्यासाठी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या संस्थेचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. 

बालाजी व्यंकटेश द्यावनपल्ली हा वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स अभ्यासक्रमाचा विद्यार्थी सध्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. दोन वर्षापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. आई विडी बनविण्याचे काम करते. दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून लहान बहिण आईस विडी बनविण्यासाठी मदत करते. गीतानगर मध्ये दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत बालाजीचा परिवार मोठी स्वप्ने उराशी बाळगून संघर्ष करीत आहे. 
आईचे परिश्रम नेहमीच अभ्यासासाठी बालाजीला प्रेरक ठरत असल्याने तो दहावीत 84 टक्के गुण घेऊन उतीर्ण झाला. वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयातून त्याने विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केले. त्यानंतर वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याचा अभियांत्रिकी पदवीसाठीचा संघर्ष सुरु झाला. त्याची सकारात्मक विचारसरणी त्याच्यासाठी वरदान ठरली. त्याचे शिक्षक आणि मित्रपरिवार त्याचे मुख्य आधारस्तंभ बनले. 
अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षातील प्रथम सत्रामध्ये ऑनलाईन क्‍लासेससाठी बालाजी गैरहजर रहात होता. त्याच्या गैरहजेरीबाबत शिक्षकांनी विचारले असता, त्याच्याकडे उत्तर नव्हते. शांत, स्वाभिमानी बालाजीला आपल्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्‍यक असणाऱ्या साधनांची कमतरता असल्याचे सांगता आले नाही. शिक्षण हाच धर्म हा वसा घेतलेल्या वालचंदच्या प्राध्यापकांनी बालाजीची अडचण जाणून घेऊन ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्‍यक असणाऱ्या साधनांची त्वरित पूर्तता केली. पदवी शिक्षणाबरोबरच इन्फोसिसच्या नौकरीसपात्र ठरण्यासाठी आवश्‍यक असणारे सर्व प्रशिक्षण बालाजीला विशेषत्वाने दिले गेले. प्राध्यापकांनी त्याच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत इन्फोसिससाठीच्या सर्व परिक्षा व मुलाखती यशस्वीरित्यापूर्ण करुन इन्फोसिस बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सिस्टिम इंजिनिअर म्हणून बालाजीने नियुक्ती मिळविली. 

सकारात्मक उर्जा दाखवते यश 
सकारात्मक ऊर्जा हिच यशस्वीतेचा मार्ग सुकर करणारी ठरते. परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी मदतीसाठी शिक्षक, मित्र आणि नातेवाईक सगळेच धावून येतात. आईच्या श्रमाचे आणि तिने दिलेल्या संस्काराचे हे फलीत आहे. 
- बालाजी द्यावनपल्ली, विद्यार्थी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com