शासकीय रुग्णालयांकडून अग्नी सुरक्षेबाबत युद्धपातळीवर उपाययोजना 

fire safty1.jpg
fire safty1.jpg

सोलापूरः येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अग्नीरोधक यंत्रणेबाबत सतर्क झाली आहे. फायर सेफ्टी ऑडिटच्या सोबत आग विझवणारे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच सुरक्षा समित्याकडून सुरक्षेच्या उपायांचा आढावा घेतला जाऊ लागला आहे. 


येथील सर्वोपचार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये अग्नीरोधक यंत्रणा बसवलेली आहे. यामध्ये आग विझवणारे सिलेंडर व पाण्याचे पाईप्स देखील प्रत्येक मजल्यावर बसवण्यात आले आहेत. दोन महिन्यापूर्वी रुग्णालयाच्या इमारतीचे फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले आहे. तसेच इमारतीमध्ये नवे सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र इमारतीमध्ये सर्वच वार्डात मोठ्या आकारांच्या खिडक्‍या असल्याने धूराचे लोट बाहेर पडू शकतात अशा पध्दतीचे बांधकाम केलेले आहे. तसेच इमारतीच्या मजल्यावर मोठ्या आकाराचे रॅम्प हे देखील संकटसमयी अधिक उपयुक्त ठरु शकतात. नियमित सेफ्टी ऑडिटसाठी अग्नीशामक यंत्रणा मदत करत असते. वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अशा दोन्ही संस्था संलग्न असल्याने या सर्व सुरक्षेच्या उपायाकडे प्रशासनाने गांभिर्याने पाहीले जात आहे. तसेच फायर सेफ्टी समितीच्या माध्यमातून सर्व सुरक्षा उपायांचा आढावा घेतला जातो. 
जिल्हाभरात असलेल्या अकरा ग्रामीण रुग्णालय व तीन उपजिल्हा रुग्णालयांकडून देखील कोरोना संकटानंतर सर्व प्रकारच्या सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या अग्नीशमन यंत्रणेची मदत घेतली जात आहे. भंडाऱ्याच्या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. 

ठळक बाबी 
- सर्वोपचार रुग्णालयात दोन महिन्यापूर्वी झाले सेफ्टी ऑडिट 
- नव्या मुदतीचे आग विझवणारे सिलेंडरची उपलब्धता 
- सुरक्षा समितीकडून सुरक्षा उपायांचा नियमित आढावा 
- जिल्हयातील शासकीय रुग्णालयांची सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया सूरू 


सेफ्टी ऑडिटची कामे सुरू 
भंडारा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य संस्थाच्या सेफ्टी ऑड़िटची प्रक्रिया युध्दपातळीवर सुरू आहे. 
- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्य चिकित्सक, सोलापूर  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com