प्रभाग 20 होतोय कोरोनामुक्‍त ! दुसऱ्या लाटेपूर्वीच नगरसेवकांनी सुरु केली जनजागृती

तात्या लांडगे
Sunday, 15 November 2020

प्रभागाविषयक ठळक बाबी...

 • आतापर्यंत 226 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह
 • एकूण रुग्णांपैकी 204 रुग्णांची कोरोनावर मात
 • आतापर्यंत 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
 • सद्यस्थितीत रुग्णालयात सहा रुग्ण घेताहेत उपचार

सोलापूर : कोरोना काळात प्रभागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यातच 16 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. आपल्या प्रभागातील नागरिक कोरोनाचे बळी ठरु नयेत, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून नगरसेवकांनी कोरोना वॉरिअर्सच्या मदतीने घरोघरी सर्व्हे केला. जनजागृतीवर भर देत स्वच्छता, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून दिले आणि लोकांमधील गैरसमज दूर केले. आता दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा जनजागृतीवर भर दिला जात असून प्रभागातील बहुतांश नगरे आता कोरोनामुक्‍त झाली आहेत.

 

प्रभागाविषयक ठळक बाबी...

 • आतापर्यंत 226 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह
 • एकूण रुग्णांपैकी 204 रुग्णांची कोरोनावर मात
 • आतापर्यंत 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
 • सद्यस्थितीत रुग्णालयात सहा रुग्ण घेताहेत उपचार

शिवगंगा नगर, हुच्चेश्‍वर नगर, विजय नगर, ललिता नगर, स्वागत नगर, अंबिका नगर, कुमठा नाका, शोभादेवी नगर, म्हेत्रे वस्ती या भागात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले. प्रभागात कोरोना वाढू नये म्हणून नगरसेविका परवीन इनामदार, अनुराधा काटकर, नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे यांनी महापालिकेच्या माध्यमातून मोबाइल क्‍लिनिक संशयितांना मोफत औषध-गोळ्या दिल्या. तर रॅपिड ऍन्टीजेनच्या माध्यमातून संशयितांची तपासणीही केली. प्रभागातील काही लोकांच्या मनात कोरोनाविषयक भिती तर काहींच्या मनात गैरसमजही होते. भिती दूर करुन गैरसमज न बाळगता सुरक्षितता म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन नगरसेवकांनी केले. नगरसेवकांच्या प्रयत्नातून महापालिकेने संशयितांच्या टेस्टसाठी एक्‍स-रे मशिन उपलब्ध करुन दिली. त्यामुळे 60 वर्षांवरील को- मॉर्बिड रुग्णांची तपासणी करणे सोयीस्कर झाले. नगरसेवकांचे प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्यातून हा प्रभाग आता कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून प्रभागात अवघे सहा ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत.

नियमांचे तंतोतंत पालन केल्याने प्रभाग कोरोनामुक्‍त होतोय
कोरोनाचा संसर्ग शहरात वाढत असताना सुरवातीच्या काळात नागरिकांमध्ये भिती होती. दवाखान्यात जायला ते तयार नव्हते. अशावेळी सर्व नगरसेवकांनी जनजागृतीवर भर देत त्यांच्या मनातील भिती दूर केली. गरजूंना धान्य, जेवण वाटप करीत घरोघरी मास्क, सॅनिटायझर, मल्टिव्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप केले.
- अनुराधा काटकर, नगरसेविका

 

जनतेने हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात आहे. तत्पूर्वी, स्वच्छता राखून सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर केल्यास निश्‍चितपणे कोरोनाविरुध्दची लढाई आपण जिंकू, असा विश्‍वास नागरिकांना दिला. प्रभागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जनजागृतीवर भर दिला. तर धान्य, मास्क, सॅनिटायझरचेही वाटप केले.
- बाबा मिस्त्री, नगरसेवक


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Ward 20 free from corona virus ! Before the second wave, the corporators started public awareness