दक्षिण सोलापूर तालुक्‍यात पाच हजार हेक्‍टरमधील पिकात पाणी ; 350 घराची पडझड

drkshbaag pani.jpg
drkshbaag pani.jpg


दक्षिण सोलापूर (सोलापूर) ; अतिवृष्टीसदृष्य पावसाने झोडपल्याने गुरुवारी (ता.17) रात्री दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मंद्रूप, विंचूर व निंबर्गी या महसूल मंडलातील सुमारे 5 हजार 63 हेक्‍टरवरील पिके पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भीमा सीना खोऱ्यातील गावातून गुरुवारी अतिवृष्टीसदृष पाऊस झाला. परिसरातील सर्व तलाव, बंधारे, ओढे ओव्हरफ्लो झाले. भीमा नदी दुथडी भरून वाहत असून व उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने पुरसदृष्य स्थिती आहे. या नदीवरील चिंचपूर बंधाऱ्यावरर तीन फूट पाणी असल्याने रस्ता दोन्ही बाजूने बंद आहे. 

भंडारकवठे, सादेपूर व औज बंधारे पाण्याखाली गेल्याने कर्नाटकशी केवळ टाकळी मार्गे संपर्क सुरू आहे. तेलगाव अरळी बंधाराही पाण्याखाली आहे. औराद बोळकवठे रस्ता खचून मोठे भगदाड पडले आहे. अनेक ओढ्यातील पाण्याचा प्रवाह बदलल्याने ते पाणी गावातील घरातही घुसले. येळेगाव येथे रस्त्याच्या बाजूच्या नाल्यांतून पाणी गावठाणातील सुमारे 17 घरात घुसले. त्यामुळे रहिवशांची तारांबळ उडाली. या घरातील बाधितांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत. तीन मंडल अधिकारी व 17 तलाठ्यांनी दोन दिवसात पीकांसह शेतीच्या व घराच्या पडझडीचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानुसार या तिन्ही मंडलातील गावातून सुमारे 5 हजार 63 क्षेत्रातील पिकांतून पाणी असल्याने हे क्षेत्र बाधित झाले आहे. या मंडलातील सुमारे 7 हजार 457 शेतकरी यामुळे अडचणीत आले आहेत. विविध गावातील सुमारे 344 घरांची पडझड झाल्याचे अहवाल आतापर्यंत प्राप्त झाल्याची माहिती अप्पर तहसिलदार सोरटे यांनी  दिली. 

गाव निहाय नुकसान 
गावनिहाय हेक्‍टरसह शेती पिकांचे नुकसान असे ः मंद्रूप 1550, वसवनगर 210,टाकळी 140, कुरघोट90, नांदणी 10,हत्तरसंग 45, कुडल 40, बंदलगी 75,बोळकवठे 110, वडकबाळ 80, होनमूर्गी 140,निंबर्गी 265,भंडारकवठे 78, माळकवठे 148,कारकल 63, औज(मं) 79,सादेपूर 37, लवंगी 27, बाळगी 33, विंचूर 260, शंकरनगर 50, कुसूर 40, खानापूर 27, तेलगाव 70, अंत्रोळी 152, वडापूर 78, कंदलगाव 360, येळेगाव 120, गावडेवाडी 138, गंजेगाव 78, अकोले (मं.) 60, वांगी 260, मनगोळी 150. 

संपादनः प्रकाश सनपूरकर  

 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com