कुठे नेऊन ठेवलायं 24 नंबर प्रभाग ! आज 53 पॉझिटिव्ह अन्‌ 17 वर्षीय मुलीसह चौघांचा मृत्यू

तात्या लांडगे
Wednesday, 30 September 2020

ठळक बाबी...

  • शहरातील 80 हजार 21 संशयितांची पार पडली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात आढळले आठ हजार 465 रुग्ण
  • आज 512 अहवालात 53 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू
  • शहरातील मृतांची संख्या आता 477 झाली; दोन दिवसांत नऊ बळी
  • आतापर्यंत सात हजार 97 रुग्णांची कोरोनावर मात; 891 रुग्णांवर उपचार सुरु

सोलापूर : शहरातील काही ठरावीक भागातच सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये उपमहापौर राजेश काठे यांच्या 24 नंबर प्रभागात सर्वाधिक 747 रुग्ण, शिवा बालटीवाला यांच्या 26 नंबर प्रभागात 626, आनंद चंदनशिवे यांच्या पाच नंबर प्रभागात 551 आणि देवेंद्र कोठे यांच्या सात प्रभागात 495 रुग्ण आढळले आहेत. आज 412 संशयितांची टेस्ट करण्यात आली असून त्यात 53 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चार जणांचा मृत्यू झाला असून रेल्वे लाईन परिसरातील 17 वर्षीय तरुणीला 2 सप्टेंबरला ऍडमिट करुन 8 सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा श्‍वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी (ता. 29) तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, कोरोनामुळे तिचा मृत्यू झाला.

 

ठळक बाबी...

  • शहरातील 80 हजार 21 संशयितांची पार पडली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात आढळले आठ हजार 465 रुग्ण
  • आज 512 अहवालात 53 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू
  • शहरातील मृतांची संख्या आता 477 झाली; दोन दिवसांत नऊ बळी
  • आतापर्यंत सात हजार 97 रुग्णांची कोरोनावर मात; 891 रुग्णांवर उपचार सुरु

 

शहरात कर्णिक नगर, झोपडपट्टी क्र. एक (विजापूर नाका), अभिमानश्री, सरस्वती नगर, बेघर वसाहत (मजरेवाडी), हिरेहब्बू कॉम्प्लेक्‍स (उत्तर कसबा), मुरारजी पेठ, न्यू पाच्छा पेठ, विजय रेसिडेन्सी, सत्यलक्ष्मी अपार्टमेंट (अशोक चौक), सैफूल, एसआरपी कॅम्प, विश्‍वरय्या हौसिंग सोसायटी (गोकूळधाम), संयोग नगर, शिवगंगा नगर (जुळे सोलापूर), लक्ष्मी चाळ (मरिआई चौक), विकास नगर, सम्राट चौक, वसंत विहार, सरस्वती हाईट्‌स (नवीन आरटीओजवळ), सिध्देश्‍वर कारखान्याजवळ, बंजारा सोसायटी (विजयपूर रोड), सिटीझन पार्क (आदित्य नगर), इंद्रधनू मरिआई चौक, गणेश नगर (नवीन आरटीओजवळ), विश्रांती चौक, बाळीवेस (उत्तर कसबा), न्यू पाच्छा पेठ, एमआयडसीसी (अक्‍कलकोट रोड), गावठाण (शेळगी), अमर नगर (सोरेगाव), संची कॉम्प्लेक्‍स (वामन नगर), रेल्वे लाईन्स (सात रस्ता), कोनापुरे चाळ (रेल्वे लाईन्स) याठिकाणी नव्या रुग्ण आढळले आहेत.

17 वर्षीय तरुणीचा झाला मृत्यू
शहरात को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे सुरु असून 'कुटूंब माझी जबाबदारी'चेही काम जोरात सुरु असतानाही रुग्णसंख्या आटोक्‍यात आलेली नाही. दोन दिवसांत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोनापुरे चाळ (रेल्वे लाईन्स) येथील 17 वर्षीय मुलीचा, सूत मिल (अक्‍कलकोट रोड) येथील 75 वर्षीय पुरुषाचा, शंकर नगरातील 67 वर्षीय पुरुषाचा आणि बुधवार पेठ परिसरातील 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where is ward number 24? Four died today, including a 53-year-old and a 17-year-old girl