रुग्णांच्या नातेवाईकांची ने-आण करताना 'त्या' वाहनचालकाला झाला कोरोना 

शांतीलाल काशीद
रविवार, 12 जुलै 2020

बार्शी तालुक्‍यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पूर्ण केले. ग्रामीण भागात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी(ता.11) ढाळे पिंपळगाव येथे तीन व साकत येथे एक कोरोना रुग्ण आढळून आल्याने साकत, घाणेगाव, पिंपळगावचा बारा कि.मी.परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. साकत 7, घाणेगाव 2, ढाळे पिंपळगाव 4 असे एकूण 13 रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मळेगाव(सोलापूर) ः बार्शी येथील दवाखान्यात नातेवाईकांना ने-आण करणाऱ्या वाहनचालकाचा कोरोना रुग्णांशी संपर्क आल्याने त्यास वैराग येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या वाहनचालकास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे विकास नगर व साकत येथील परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. 

हेही वाचाः तिसंगी सोनके तलाव उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याने भरला 

बार्शी तालुक्‍यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पूर्ण केले. ग्रामीण भागात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी(ता.11) ढाळे पिंपळगाव येथे तीन व साकत येथे एक कोरोना रुग्ण आढळून आल्याने साकत, घाणेगाव, पिंपळगावचा बारा कि.मी.परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. साकत 7, घाणेगाव 2, ढाळे पिंपळगाव 4 असे एकूण 13 रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचाः राज्यस्तरीय त्रीसदस्यीय तज्ञ समितीची बार्शीला भेट 

शनिवारी साकत येथील वाहनचालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने साकत येथील कोरोना रुग्णांची संख्या 7 वर गेली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना वाहनाद्वारे नेआण करणारा वाहनचालक कोरोनाबाधीत निघाल्याने विकासनगर व साकत येथे भीतीचे सावट निर्माण झाले आहे. ढाळे पिंपळगाव येथील मयत कोरोना रुग्णांच्या कुटूंबातील 2 पुरुष व 1 स्त्री कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यांच्या संपर्कातील 18 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सतर्कतेचा उपाय म्हणून गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांना मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे. ढाळे पिंपळगाव येथील मयत कोरोना रुग्णांच्या संपर्कातील उपळे येथील 2 व पिंपरी (सा) येथील 4 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.  
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While transporting the relatives of the patients, 'that' driver got corona