उजनी धरणात मासेमारांसाठी वडाप का टाकले म्हणून सख्या चुलत भावाची केली हत्या

crime.jpg
crime.jpg

करमाळा(सोलापूर): करमाळा तालुक्‍यातील चिखलठाण नं.1 येथे उजनी धरणात मच्छीमारांसाठी वडाप टाकण्याच्या कारणावरून काठीने मारहाण करून अजित नवनाथ गलांडे वय (वय 23) या तरूणाची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत मयताचे वडील नवनाथ बलभिम गलांडे (वय 53 )रा. चिखलठाण नं.1 ता. करमाळा जि. सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याबाबत संशयित आरोपी उमेश राजाराम गलांडे ,संतोष राजाराम गलांडे, राजाराम बलभिम गलांडे सर्व रा. चिखलठाण नंबर 1 ता. करमाळा जि.सोलापूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत हकीकत अशी की,शनिवार( ता.11) रोजी संध्याकाळी 7.15 वा फिर्यादी नवनाथ गलांडे यांची मुले मिथुन नवनाथ गलांडे व अजित नवनाथ गलांडे हे गलांडे मळ्याचे शेजारी भीमा नदीचे काठी चिखलठाण नं 1 ता. करमाळा येथे माशाचे जाळे विणण्याचे काम करीत होते. तेव्हा संशयीत आरोपी उमेश राजाराम गलांडे, संतोष राजाराम गलांडे व राजाराम बलभिम गलांडे सर्व चिखलठाण नं.1 ता. करमाळा जि. सोलापूर यांनी हातामध्ये काट्या घेवुन तेथे आले. फिर्यादीचा मुलगा मिथुन गलांडे व अजित गलांडे यास मासेमारी करण्यासाठी वडाप या ठिकाणी का लावले? ही जागा आमची आहे असे म्हणून सोबत आणलेल्या हातामधील काठीने दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यामध्ये अजित गलांडे यास ठार मारले आहे तसेच मुलगा मिथुन गलांडे यास गंभीर जखमी केले आहे. याबाबत करमाळा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तेलतुमंडे करत आहेत. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com