वाचा...खरीप पेरणीपूर्व मशागत का गरजेची आहे 

Why it is necessary to cultivate before sowing kharif
Why it is necessary to cultivate before sowing kharif

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात आता खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्‍यक पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. सर्वत्र कामाची लगबग पाहण्यात येत आहे. काहींनी बैलजोडीद्वारे तर उर्वरित ट्रॅक्‍टर आधारे मशागतीची कामे होत आहेत. 
खरीप हंगामात पिकाच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमिनीची मशागत करणे नितांत गरजेचे असते. पीक वाढण्याकरिता जमीन भुसभुशीत करणे, तण काढणे, शेतजमीन पेरणीयोग्य केल्यास पिकाचे उत्पादन चांगले येते. मशागतीने जमीन भुसभुशीत व रवाळ होते. पावसाचे पाणी जमिनीत मुरून ओलावा टिकतो. मशागतीने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. खत जमिनीत मिसळून कीटकांना व रोगराईस आळा बसतो. जमिनीत हवा खेळती राहून ती पिकांना पोषक ठरते. जमिनीत रासायनिक क्रिया चांगली होऊन पिकाला पोषक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. पिकाची उगवण आणि वाढ चांगली होऊन उत्पन्नात वाढ होते. जमीन नांगरल्याने आधीच्या पिकाची मुळे, पालापाचोळा गाडले गेल्याने ते कुजून मातीतील सेंद्रिय पदार्थांत वाढ होते. त्याचबरोबर जमिनीतील जीवजंतू, कीटक आदींचा उन्हाने नाश होतो. 
पेरणीसाठी आता 20 दिवसांपेक्षा कमी अवधी असल्याने अक्कलकोट तालुक्‍यात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतजमीन तयार करणे, बियाणे व खताची जमवाजमव करत आहेत. अक्कलकोटला खरीप हंगामात मुख्यतः तूर, बाजरी, सूर्यफूल, भुईमूग, मूग, उडीद, तीळ आदी पिकांची लागवड केली जाते. तालुक्‍यातील बहुतांश क्षेत्र हे तुरीचेच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com