संगेवाडी येथे महिला शेतकरी मेळावा 

mahila shetkar.jpg
mahila shetkar.jpg

सोलापूर ः संगेवाडी येथे लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या महिला शेतकरी मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. 
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाने हे आयोजन केले होते. 
या कार्यक्रमासाठी तालुका व्यवस्थापक दीपमाला सोमाणे, माणदेशी फौंडेशन मनीषा मोरे व अर्चना खर्चे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संगेवाडीच्या सरपंच नंदादेवी वाघमारे यांनी भूषविले. 
यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला शारदा रणदिवे, आशा वाघमारे, सारिका बाबर, वर्षाराणी अंकुशराव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वक्‍त्यांनी महिला सक्षमीकरण, हुंडाबळी, मुली वाचवा या बाबत मार्गदर्शन केले. प्रा. ज्योती गायकवाड यांनी महिलांसाठी कृषी क्षेत्रात असलेल्या व्यवसायाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करीत गावातील महिलांना व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी आहेत हे सांगितले. 
या कार्यक्रमास संगम महिला ग्रामसंघ, सर्व पदाधिकारी, संगेवाडी ग्रामसेवक मंगेश पोरे व इतर ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया हुंडेकरी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमंगल एबीएमच्या प्रा. निशा काटे यांनी केले व आभार प्रा. शुभांगी काळे यांनी केले. या कार्यक्रमास लोकमंगलचे प्राध्यापक गणेश वांडरे व प्रविण शेळके उपस्थित होते. कार्यक्रमासाठी लोकमंगल एबीएमचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com