चुलत भावाच्या त्रासास कंटाळून तरूणाची आत्महत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी गडबडीत उरकला अंत्यविधी 

दत्तात्रय खंडागळे 
Sunday, 13 September 2020

मृतदेह सांगोला येथे डॉक्‍टराकडे घेऊन जाऊन सुद्धा त्यांनाही खरे कारण न सांगता त्याने गळफास घेतला आहे, असे कोणाला समजू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शवविच्छेदन न करता मृतदेह घाईगडबडीने घेरडी येथे परत आणून अंत्यविधी केला, अशी फिर्याद मयताचे वडील जालिंदर रामचंद्र खुळपे यांनी सांगोला पोलिसात दिली. 

सांगोला (सोलापूर) : चुलत्याच्या घरी राहण्यास असताना त्याच्या कामाच्या पैशाच्या कारणावरुन तसेच भावजयीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून चुलत भावांच्या मानसिक त्रासाला कंटाळून तणावाखाली येवून एकाने रहात्या घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र हा प्रकार बाहेर समजेल म्हणून चुलत भावानीच तो बाथरूममध्ये चक्कर येवून पडल्याचा बनाव करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांच्या आई-वडिलाना खरे कारण न सांगता त्याचा घाई गडबडीने अंत्यविधी उरकला. ही घटना 27 मार्च 2020 रोजी रात्री एकच्या सुमारास घेरडी (ता. सांगोला) येथील महादेव खुळपे यांच्या घरी घडली होती. मात्र जालिंदर रामचंद्र खुळपे यांनी शनिवार (12 सप्टेंबर) रोजी तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. 
फिर्यादी जालिंदर रामचंद्र खुळपे (रा. घेरडी, ता. सांगोला) यांचा मुलगा ऋषिकेश उर्फ मोगर जालिंदर खुळपे हा 2009 ते 27 मार्च 2020 पर्यंत फिर्यादीचा मोठा भाऊ महादेव खुळपे यांच्या घरी राहण्यास होता. दरम्यान ऋषिकेश याचे याच्या कामाच्या पैशाच्या कारणावरून सचिन महादेव खुळपे, युवराज महादेव खुळपे, नितीन महादेव खुळपे या तिघांनी मिळून त्यास मानसिक त्रास दिल्याने सततच्या त्रासाला कंटाळून व तणावाखाली येऊन ऋषिकेश उर्फ मोगर कुलपे यांनी 27 मार्च रोजी रात्री एकच्या सुमारास महादेव खुळपे यांच्या नव्या घरासमोरील लोखंडी जिन्याच्या पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान त्याने आत्महत्या केली असून ही चुलत भावांनी त्याच्या आई-वडिलांना तो बाथरूममध्ये पडून मयत झाला आहे, असे खोटे सांगितले. तसेच मृतदेह सांगोला येथे डॉक्‍टराकडे घेऊन जाऊन सुद्धा त्यांनाही खरे कारण न सांगता त्याने गळफास घेतला आहे, असे कोणाला समजू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे शवविच्छेदन न करता घाईगडबडीने घेरडी येथे परत आणून अंत्यविधी केला, अशी फिर्याद मयताचे वडील जालिंदर रामचंद्र खुळपे यांनी पोलिसात दिली. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man commits suicide due to cousin harassment in Sangola taluka