अखेर दहाव्या दिवशी पुणे-सांगली एसटी सेवा सुरु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

- पुराचे पाणी ओसरल्याने सांगलीला जाणारे मार्ग खुले झाल्याने एसटी प्रशासनाने आज (ता.14) दहाव्यादिवशी पुणे-सांगली एसटी सेवा सुरू केली
- मंगळवारी कोल्हापूर एसटी सेवा सुरळीत करण्यात आल्याने या दोन्ही शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना चांगला दिलासा मिळाला आहे.
- दोन्ही शहरांची सेवा सुरू झाल्याने स्वारगेट एसटी स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.

पुणे : पुराचे पाणी ओसरल्याने सांगलीला जाणारे मार्ग खुले झाल्याने एसटी प्रशासनाने आज (ता.14) दहाव्यादिवशी पुणे-सांगली एसटी सेवा सुरू केली. मंगळवारी कोल्हापूर एसटी सेवा सुरळीत करण्यात आल्याने या दोन्ही शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना चांगला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दोन्ही शहरांची सेवा सुरू झाल्याने स्वारगेट एसटी स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.

पूरपरिस्थितीमुळे सांगली, कोल्हापूरला रस्त्यामार्गे होणारी वाहतूक दहा दिवसापासून ठप्प होती. दोन-तीन दिवसापासून पाण्याची पातळी कमी झाल्याने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने मंगळवारी (ता.13) पुणे-कोल्हापूर सेवा सुरू केली होती. तर आज (बुधवारी) सकाळी दहाच्या सुमारास पुणे-सांगली एसटी सेवा सुरू केली. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रवाशांच्या सोयीसाठी दोन्ही शहरांसाठी जास्ती जास्त गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, on the tenth day Pune-Sangli ST service is started