मुष्टीयुद्ध स्पर्धेत सातारा संघ सर्वात्कृष्ट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

लोणी काळभोर : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आणि लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय पाचव्या सबज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

लोणी काळभोर : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आणि लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय पाचव्या सबज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ३६ किलो वजनी गटात सातारा जिल्ह्याचा रोहित चोरसिया, ३८ किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याचा उमर शेख, ४० किलो वजनी गटात पुणे शहराचा रोहित पवार, ४२ किलो वजनी गटात साताऱ्याचा पार्थ ढोणे, ४४ किलो वजनी गटात धुळ्याचा नयन सोनावने, ४६ किलो वजनी गटात साताऱ्याचा कुणाल माने, ४८ किलो वजनी गटात मुंबई उपनगरच्या लकी श्रीवास्तव याने विजयी पंच लागवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तसेच सर्वाधिक ४० गुण मिळवत सातारा जिल्हा मुष्टीयुद्ध संघाला काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या पाचव्या सबज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झाला.

अंतिम 36 किलो वजनी गट रोहित चौरसियाला सुवर्ण वेदांत बेगले रौप्य पदक. 
38 किलो उमर शेखला सुवर्ण, आदित्य जाधव याला रौप्य,
४० किलो रोहित पवार सुवर्ण, सुमीत खरात रौप्य,
४२ किलो पार्थ ढोणे सुवर्ण, प्रतिक्ष भालेराव रौप्य,
४४ किलो नयन सोनावने सुवर्ण, शुभम कारले रौप्य,
४६ किलो कुणाल माने सुवर्ण, सनी कापसे रौप्य,
४८ किलो लकी श्रीवास्तव सुवर्ण, शाश्वत तिवारी रौप्य,
५० किलो राहूल सिंग सुवर्ण, विकी कामत रौप्य,
५२ किलो ओमकार चौगुले सुवर्ण, चैतन्य पेंडनेकर रौप्य,
५४ किलो आयुष मोकाशी सुवर्ण, सुयश चौगुले याला रौप्य,
५७ किलो कुणाल घोरपडे सुवर्ण, ओमकुमार फरांडे रौप्य,
६० किलो चैतन्य कोलेकर सुवर्ण, किरण पवार रौप्य,
६३ किलो अन्वर मुजावर सुवर्ण, तेजस पारखे रौप्य,
६६ किलो अभिवर्धन शर्मा सुवर्ण, रनवीर भोसले रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.

सातारा संघ सर्वात्कृष्ट
 पाचव्या सब-ज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेत सर्वात्कृष्ट खेळ करत ४० गुणांसह सातारा जिल्हा मुष्टीयुद्ध संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले. पुणे जिल्हा आणि पुणे शहर मुष्टीयुद्ध संघाला अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक मिळाले. सर्वात्कृष्ट मुष्टीयुद्धा म्हणून साताऱ्याचा कुणाला माने याला गौरविण्यात आले. 

Web Title: Satara team s the best among the boxing championship