अमरावतीच्या दोघांना विविध गुन्ह्यात दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

राजेंद्र होळकर
शुक्रवार, 29 जून 2018

इचलकरंजी - वाटमारी, प्राणघातक हल्ला करणे, खंडणी, अवैधपणे शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे असणाऱ्या दोघा गुंडांना आज अमरावती विशेष न्यायालयाने प्रत्येकी 10 लाखांचा दंड व 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. शिक्षा झालेले हे गुन्हेगार लोणी टाकळी (जि. अमरावती) चे राहणारे आहेत. अशी माहिती गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपाधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली आहे.

आकाश हरिशचंद्र गायगोले (वय 20), त्यांचा साथीदार श्रीकांत सुधाकर ढोके (वय 30) अशी न्यायालयाने शिक्षा ठोठविलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. वडनेर (जि. अमरावती) येथील किशोर जगदीश भोयर त्यांच्या मित्र निखील माणिकराव माहोरे (दोघे रा.वडनेर, जि.अमरावती) हे दोघे जण 29 मे 2016 रोजी दुचाकीवरुन लोणीवरुन वडनेरला जात होते. यावेळी या दोघांना रस्त्यावरील हॉटेल आतिथ्य नजीक आकाश गायगोले आणि श्रीकांत ढोके यांनी अडविले. त्यांच्यावर चाकू, तलवारीने प्राण घातक हल्ला केला. या दोघांना वाचविण्यासाठी अमित मदनगोपाल यादव हे धावले. त्यांच्यावरही या दोघा गुंडानी हल्ला केला. याप्रकरणी लोणी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

याच दरम्यान गुंड आकाश गायगोले आणि श्रीकांत ढोके याच्या गुन्हेगारी कारनाम्याची दखल घेवून, त्यांच्या विरोधी मोकातंर्गत कारवाई केली होती. या प्रकरणाचा तपास गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपाधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी करुन मोका न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. आज या खटल्याची न्यायालयात सुनावणी होवून गुंड आकाश गायगोले आणि श्रीकांत ढोके या दोघांना न्यायालयाने दोषी धरले. न्यायालयाने त्या दोघाना प्रत्येकी 10 लाखांचा दंड व 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक श्री.घाडगे यांनी दिली.

Web Title: Kolhapur News Amaravati special court report