'पलूसमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नाही'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

कऱ्हाड - पतंगराव कदम यांच्या निधनाने पलूस विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार देणार नाही. ती जागा कॉंग्रेस पक्ष लढवेल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांना मदत करेल, असे राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

श्री. पाटील यांनी आज यशवंतराव चव्हाण आणि पी. डी. पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेने विधान परिषदेसाठी भाजपला मदत केली आहे, या मुद्‌द्‌यावर श्री. पाटील म्हणाले, की शिवसेना बोलते तसे वागत नाही. धड विरोधी पक्षातही नाही आणि सत्तेतही नाही, अशी त्यांची स्थिती आहे. विधान परिषदेच्या प्रत्येकी तीन जागा कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढविण्यावर एकमत झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

केंद्र सरकारने साखर कारखान्यांना सध्या दिलेली मदत कमी आहे, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, ""साखर निर्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर आणि सध्याचे दर यामध्ये फरक आहे. तो भरून निघाला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने हे अनुदान वाढवले पाहिजे. राज्य सरकारनेही त्यात भर घालून वाढ करण्याची गरज आहे. सध्या साखरेचे दर कमी झाले आहेत. ही स्थिती अशीच राहिली, तर साखर उद्योग मोडीत निघेल.'' 

Web Title: ळo NCP candidate in Palus