कोल्हापूर - बहिरेवाडीजवळ अपघातात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

उतूर (कोल्हापूर) : बहिरेवाडी (ता. आजरा) जवळ इओन कार (एमएच 07-क्यु-6547) झाडाला धडकून प्रदीप राजाराम गावडे (वय 46) हे अभियंता जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा कौस्तुभ (वय 17) हा किरकोळ जखमी झाला. सकाळी 8 वाजता हा अपघात घडला.

गावडे सावंतवाडीहून कोल्हापुरकडे आपल्या कारने चालले होते. बहीरेवाडी गावाजवळ त्यांचा कारवरील ताबा सुटून कार विरुद्ध दिशेला जाऊन झाडाला धडकली. धडक इतकी जोरात होती की यामध्ये कारचे स्टेआरिंग पोटात घुसले. तर डोके समोरील काचेवर आपटले यावेळी मोठा रक्तस्राव झाल्याने ते जागीच ठार झाले. कौत्सुभला नागरीकांनी गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Web Title: 1 died in accident in bahirewadi