दुचाकी-चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मोहोळ : मोटार सायकल व चारचाकी यांची धडक होऊन झालेल्या अपघातात, एका बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी (ता. 19) रात्री दहा वाजता सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळपासून 5 किमी अंतरावरील, अनगर चौकात घडली. सरलैस औदुंबर उघडे (वय 42, रा. अनगर) असे मृताचे नाव आहे.

या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत सरलैश उघडे हे मोहोळ शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत कार्यरत होते. बँकेचे कामकाज संपवून व घरातीत किरकोळ कामे संपवुन ते घराकडे एमएच 13 एए 5638 वरून अनगरकडे निघाले होते.

त्यांची मोटार सायकल अनगर चौकातुन अनगर गावाकडे वळत असताना, पुण्याकडुन सोलापुरकडे भरधाव निघालेली मारूती सियाज कार क्र एम एच 13 सी एस 7483 हीने मोटार सायकलला जोराची धडक दिली. त्यात सरलैश हे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. या प्रकरणी दिपक गौतम उघडे यांच्या फिर्यादीवरून कार चालक सदाशिव महारू द्रप्पा मुडोडगी (रा. चाकोते नगर, सोलापूर) याच्या विरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार नागप्पा निंबाळे करीत आहेत. 
 
Web Title: 1 died in four wheeler two wheeler accident