मालट्रक-टेंपोेच्या धडकेत एकाचा अपघात

राजकुमार शहा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मोहोळ : मालट्रकला टेंपोने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चौघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (ता. 27) सकाळी साडेसहा वाजता मोहोळजवळील नागनाथ विद्यालयाशेजारी असलेल्या पुलावर झाला. अली महंमद शेख (रा. इटकळ ता. तुळजापुर) असे मृताचे नाव आहे. तर चांद बाबुलाल नदाफ, फर्जाना चांद नदाफ व त्यांची दोन लहान मुले (सर्व रा. लोहगाव, ता. तुळजापूर) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने मदत केल्याने जखमीचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली आहे.

मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालट्रक क्र .एम एच 10 झेड 3213 ही सोलापूरकडे निघाली होती. तर त्याचवेळी टेंपो क्र. एम एच 46 ए आर 6514 हाही सोलापूरकडे निघाला होता. दोन्ही वाहने पुलावर येताच, आयशर चालकाचे टेंपोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने ट्रकला पाठीमागुन जोराची धडक दिली. त्यात अली महमंद शेख हा गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला, तर नदाफ पती पत्नी व त्यांची दोन मुले जखमी झाली.

अपघात झाल्याचे समजताच मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व अपघात पथक मदतीसाठी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी मदत कार्य सुरू केले. त्याच वेळी एनडीआरएफचे पोलीस उपनिरीक्षक बिपीन बिहारी सिंह व त्यांचे सहकारी पुण्याकडे निघाले होते. त्यानी हे दृष्य पाहताच मदत कार्य सुरू केले. त्यांनी चेपटलेली केबीन सरळ करून व अथक प्रयत्नानंतर जखमी ना बाहेर काढले. त्यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली. या अपघाताची नोंद मोहोळ पोलीसात झाली आहे.

Web Title: 1 dies in accident of truck and tempo