अॅट्रासिटीची केस मागे घेण्यावरून एकाची हत्या

राजकुमार शहा 
शुक्रवार, 22 जून 2018

मोहोळ (सोलापूर) : अॅट्रासिटी व अतिप्रसंगाची केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरूऩ एका 45 वर्षीय व्यक्तीचा लाकडी दांडके व विटाने मारहाण करून खुन केल्याची घटना मोरवंची ता मोहोळ येथे गुरुवारी (ता. 21) रात्री साडेआठ वाजता घडली या प्रकरणी एका महिलेसह दोघावर गुन्हा दाखल झाला आहे. अशोक विश्वभर शिन्दे (45 ) असे मृताचे नाव आहे 

मोहोळ पोलीसांकडुन मिळालेल्या माहिती नुसार मोरवंची येथील राणी सिकंदर शिन्दे हिने मोरवंचीतील एका वर अॅट्रासिटी व अतिप्रसंगाची फिर्याद दिली होती. ती मागे घेण्याच्या कारणावरून राणी शिन्दे व सिकंदर अशोक शिन्दे यांच्यात भांडण सुरू होते, त्यावेळी त्या ठिकाणी अशोक विश्वंभर शिन्दे आला व दिलेली फिर्याद मागे घेऊ नको असे सांगु लागला त्या गोष्टीचा राग येऊन राणी शिन्दे व सिकंदर शिन्दे यांनी अशोकला लाकडी दांडके व विटाने मारहाण केली. त्यात अशोक गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. 

दरम्यान सिकंदऱ हा मारहाण करून पळुन गेला होता. मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हवालदार लोबो चव्हाण हवालदार मुलाणी हवालदार कटक धोंड यांनी तपासाची चक्रे फिरवुन आरोपीला चार तासात मोहोळ येथील शिवाजी चौकात अटक केली. या प्रकरणी वसंत विश्वंभर शिन्दे यानी मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे.

Web Title: 1 killed for not take back a atrocity case