चोरी केली कोल्हापुरात आणि अटक..

10 Kg Stheft in Kolhapur
10 Kg Stheft in Kolhapur

उजळाईवाडी (कोल्हापूर) ः कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिल्वर झोनमधील राजकुमार अरविंद वाईंगडे यांच्या चांदी कारखान्यातून परप्रांतीय कारागिरांने 10 किलो 800 ग्रॅम चांदीची चोरी केली होती. कागल औद्योगिक वसाहत पोलिसांनी पश्‍चिम बंगालमध्ये कारवाई करीत साडेतीन किलो चांदीचा मुद्देमाल व आरोपी सुनील असिम धुलाई ( वय 23 रा. पूर्व पन्नापाडा ता. घटाला जि. मीदिनापूर) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 13 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजकुमार रवींद्र वाईंगडे (वय 42) यांचा कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या सिल्वर झोनमध्ये रणजित सिल्वर या नावाने कारखाना आहे. 19 डिसेंबर 2019 रोजी पहाटे सुनील अशिम दूलाई (23) व बबलू हेमरम (वय 27 रा. तळ्यागिर्या, जिल्हा पश्‍चिम मिदनापूर, पश्‍चिम बंगाल) या कारागिरांनी पहाटे 2.24 चे सुमारास सदर कारखान्यातून 4 लाख 53 हजार 600 रुपये किमतीचे चांदीचे तयार सूत, रवे, डिझाईन, झुमके ,बेस्ट असे एकूण 10 किलो 800 ग्राम चे चांदीच्या वस्तू घेऊन थेट पश्‍चिम बंगालकडे पोबारा केला. वाईंगडे यांनी दोघांविरुद्ध चांदी अपहाराचा गुन्हा दाखल केला होता . सहायक फौजदार दिलीप तिवडे व कॉन्स्टेबल उदय कांबळे यांनी पश्‍चिम बंगाल मध्ये जाऊन कारवाई करीत साडेतीन किलो चांदी व आरोपी सुनील दुलाई याला अटक करीत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यांमध्ये आणले. 

चांदी व्यापाऱ्यांकडून कौतुक 
सुनील दूलाई व बबलू हेमरम यांनी दहा किलो 800 ग्रॅम चांदीचा वापर करून पश्‍चिम बंगाल ला पोबारा केला परंतु गोकुळ शिरगाव पोलिसांनी थेट पश्‍चिम बंगाल मध्ये जाऊन धाडशी कारवाई करीत साडेतीन किलो चांदीचा मुद्देमाल व आरोपींना अटक केल्यामुळे चांदी व्यापाऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com