सांगली जिल्ह्यात १० टक्केच पेरणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

सांगली - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून हलक्‍या पावसाच्या सरी अन्‌ ढगाळी वातावरण आहे. खरीप हंगाम सुरू होऊन पंधरवडा झाला तरी पेरणी १०-१२ टक्केही झालेली नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यातही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. डोळ्यावर कातडे ओढून गेल्या दोन दिवसापासून शिवारात पेरण्यांची जोरदार लगबग सुरू आहे. परिणामी यंदाही खरीप हंगामात जेमतेम पेरणी आणि रब्बीच्या क्षेत्रात वाढीचीच चिन्हे आहेत. खरिपासाठीचे बियाणे शिल्लक राहण्याचा धोका आहे. 

यंदा पाऊस वेळेत दाखल होणार आणि शंभर टक्‍क्‍यांहून अधिक हजेरी लावणार, या हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी खुशीत होते. 
खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जमिनींची मशागत, खते घालून तयार ठेवली होती. पावसाळ्यांच्या सुरवातीला शिराळा तालुक्‍यात धूळवाफेवरील चांगली पेरणी झाली. यंदा मॉन्सूनपूर्व चांगला पाऊस झाला. 

त्यामुळे खरीप हंगाम हुमकी मिळणार असे शेतकऱ्यांना वाटत होते. कृष्णा-वारणा नदीकाठावरील बागायत क्षेत्रात सोयाबिन, भुईमूग पिके डोलू लागली आहेत. सध्याच्या रिमझिम जमिनीत मुरणारा पाऊसही सोयाबिन, उसा पिकांसाठी अतिशय चांगला आहे. ढगाळी वातावरणात ऊस आणि सोयाबिन पीक जोमात ताल धरून आहे. 

सध्या पाऊस लांबला. गेल्या चार दिवसांच्या रिमझिम पावसावरही शेतकरी खरिपातील पेरणीचा जुगार खेळत आहेत. यापूर्वी पेरण केलेल्या पिकांना चार- आठ दिवस जीवदान मिळणार आहे. पुरेशी ओल नसल्याने बऱ्याच ठिकाणी बियाणे वाळलेल्या जमिनीत जात आहे. तरीही पावसांच्या आशेवर शेतकरी पेरणीचा जुगार खेळताहेत.  

* खरीप क्षेत्र - ३ लाख ६१ हजार ४०० हेक्‍टर 
* खरीप गावांची संख्या - ६३१ 
* कडधान्याच्या क्षेत्रात घट शक्‍य 

खरिपाचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
 ज्वारी    ६४ हजार
 सोयाबीन    ५८ हजार ८००
 बाजरी    ४३ हजार ४००
 भुईमूग    २६ हजार
 भात    १७ हजार २००
 मका    २८ हजार 
 तूर    ७ हजार ४००
 उडीद    ७ हजार ८००
 सूर्यफूल    ८ हजार ५००

Web Title: 10 percent cultivation in sangli district