Sangli : मतदार नोंदणी मोहिमेत नवमतदारांचे १० हजार अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

मतदार नोंदणी मोहिमेत नवमतदारांचे १० हजार अर्ज

सांगली : सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघामधील सर्व पात्र (१८ वर्षे पूर्ण) लोकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ठ करण्याबाबत १ नोव्हेंबरपासून सुरु झालेली मोहिम मंगळवारी ( ता. ३०) संपणार आहे. गुरुवार अखेर नवमतदारांचे १० हजार अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारी ( ता. २७ ), रविवारी ( ता. २८) विशेष मोहिमेतंर्गत सर्व मतदान केंद्रावर नोंदणी अधिकारी नवमतदार नोंदणी करुन घेतील. आगामी जि. प., पं. स. च्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर नोंदणीला महत्व आहे.

केंद्रिय निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०२२ या दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम १ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान आयोजित केली आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघामधील सर्व पात्र (१८ वर्षे पूर्ण) लोकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ठ असल्याबाबत खात्री करावी. तसेच नवमतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ असल्याबाबत www.ceo.maharashtra.gov.in व www.nvsp.in वर खात्री करावी. ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ठ नाहीत त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत तसेच २७ व २८ नोव्हेंबर २०२१ या विशेष मोहिमेदिवशी नजीकच्या मतदार केंद्र, मतदार मदत केंद्र, निवडणूक शाखा, तहसिल कार्यालयात मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी नमुना नं. ६ चा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जमा करावयाचा आहे. मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी www.nvsp.in वर ऑनलाईन रजिस्ट्रेशनव्दारे मतदार नाव नोंदवू शकतात. मतदार यादीतील तपशिलात दुरूस्ती करणे, मतदार यादीतून नाव कमी करणे व एकाच मतदार संघामधील पत्त्यात बदल करण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

‘ मतदार नोंदणीसाठी महिनाभराचा कालावधी दिला आहे. आजअखेर १० हजार नोंदणीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारी-रविवारच्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नोंदणी करावी. ऑफलाईन तसेच ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया उपलब्ध आहे.

एम. बी. बोरकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सांगली.

पॉईटर...

विधानसभानिहाय मतदार

* मिरज- ३.१८ लाख

* सांगली- ३.२० लाख

* इस्लामपूर-२.७२ लाख

* शिराळा- २.९५ लाख

* पलूस-कडेगाव-२.८३ लाख

* खानापूर-३.२८ लाख

* तासगाव-कवठेमहांकाळ- २.९९ लाख

* जत- २.७४ लाख

एकूण जिल्हा २३.९२ लाख

loading image
go to top