बालिकेवर बलात्कार प्रकरणी एकाला 10 वर्षांची शिक्षा

बालिकेवर बलात्कार प्रकरणी एकाला 10 वर्षांची शिक्षा

कोल्हापूर - घरासमोर खेळणाऱ्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकाला दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी दहा वर्ष कैद व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पांडुरंग मारुती पाटील (वय 42 रा. कणेरीवाडी) असे त्याचे नाव आहे. कणेरीवाडी येथे 2013 ला घडलेल्या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिसांत नोंद झाली होती. सरकारी वकील म्हणून अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले. 

अधिक माहिती अशी; कणेरीवाडी येथे संशयित पांडुरंग पाटील राहतो. 2013 ला त्याने घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून घरी बोलावले व तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित बालिकेला याबाबत आपल्या घरी सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पांडुरंग पाटील विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी. पिसाळ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अंतिम सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस आर पाटील यांच्यासमोर झाला.

अॅड. अमिता पाटील यांनी या कामी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. त्यांनी या खटल्यात 7 साक्षीदार तपासले. यातील पीडीत, डॉक्‍टर, पालक यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधिश श्रीमती एस. आर. पाटील यांनी कलम 375 ,354 व बाललैगिक अत्याचार कलमानुसार आरोपी पांडुरंग पाटील ला 10 वर्ष कैद व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. कॉन्स्टेबल वर्षा पाटील, वनिता चव्हाण यांनी खटल्याचे कामकाज सुरू असताना महत्वपूर्ण मदत केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com