शंभर "सीसीटीव्हीं'ची कऱ्हाड शहरावर नजर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कऱ्हाड -  स्वच्छता व सुरक्षिततेच्यादृष्टीने कऱ्हाड शहरात लवकरच आणखी 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत पालिकेने हा निर्णय घेतला असून कॅमेरे बसवण्याची ठिकाणे निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. 

कऱ्हाड -  स्वच्छता व सुरक्षिततेच्यादृष्टीने कऱ्हाड शहरात लवकरच आणखी 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत पालिकेने हा निर्णय घेतला असून कॅमेरे बसवण्याची ठिकाणे निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. 

स्वच्छ सर्वेक्षणातील प्रभावाने शहरात स्वच्छतेत मिळवलेला लौकिक कायम ठेवण्यासाठी नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी स्वच्छता व सुरक्षिततेच्यादृष्टीने शहरात 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी मागणी केली आहे. या कॅमेऱ्यांचा खर्च कोणत्या निधीतून होणार, याबाबत उत्सुकता आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत हागणदारीमुक्तीसाठी मिळालेल्या प्रोत्साहनपर दीड कोटींच्या निधीतून कॅमेरे बसवण्याचा पर्याय पालिकेकडे आहे. पालिकेने यापूर्वी शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे 30 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिसांकडून या उपक्रमाचे कौतुकही होत आहे. या कॅमेऱ्यांमुळे काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील दरोडेखोर जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले. त्यात आता आणखी 100 कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिकेने सर्वांच्या सहकार्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती कायमस्वरूपी राहाण्यासाठी स्वच्छता व सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्हीची आवश्‍यकता आहे. 
- विजय वाटेगावकर, नगरसेवक, कऱ्हाड 

Web Title: 100 CCTV cameras Watch on karad city