सांगलीकरांचा स्वयंस्फूर्त कर्फ्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यू च्या आव्हानाला सांगलीत सकाळपासून कडकडीत बंदने प्रतीसाद मिळाला आहे. दर रविवारी सकाळी गजबजलेले एसटी स्टॅन्ड चौक, छत्रपती शिवाजी मंडई, मारुती चौक ही सर्व ठिकाणे आज सकाळपासून पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले.

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यू च्या आव्हानाला सांगलीत सकाळपासून कडकडीत बंदने प्रतीसाद मिळाला आहे. दर रविवारी सकाळी गजबजलेले एसटी स्टॅन्ड चौक, छत्रपती शिवाजी मंडई, मारुती चौक ही सर्व ठिकाणे आज सकाळपासून पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले.

कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात जनता करण्याचे आवाहन केले आहे त्याला सांगली शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे रविवार हा तसा सुट्टीचा वार असल्याने शहरातील काही चौक नेहमी गजबजलेले असतात. मात्र आज छत्रपती शिवाजी मंडई तसेच मारुती चौक पूर्ण शांत होता. तर शहरातील मध्यवर्ती एसटी स्टँड संपूर्ण मोकळे होते. स्टेशन रोड, गणपती पेठ, बालाजी चौक, सांगली मिरज रोड हे प्रमुख रस्तेही सकाळी नऊच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून आले.

शहरात सकाळी सात वाजेपर्यंत दिसणारे पेपर विक्रेते दूध विक्रेते आज सातच्या आतच आपापली कामे आटोपून परतत होते. परगावाहून येणाऱ्या दूध विक्रेत्यांनी तर सकाळी सहा सव्वासहा पर्यंतच आपल्या नेहमीच्या ग्राहकांना दूध देऊन आपले कर्तव्य बजावले होते. तर पेपर विक्रेत्यांनीही नेहमीपेक्षा अर्धा ते पाऊण तास लवकरच पेपर वाटप संपवले होते. त्याचबरोबर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिकही सात सव्वा सात पर्यंत कर्फ्यू पाळण्याच्या इराद्याने लगबगीने घरी परतताना दिसून आले.

 सांगलीत 2009 मध्ये झालेल्या मिरज दंगलीवेळी संचारबंदी कोकणात आली होती सुमारे आठवडाभर सांगलीत संचारबंदी होती त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्त्यावर ठिकाणी एसआरपी पोलीस दिसत होते. रस्त्यावर नागरिक दिसले तर बदडून हाकलून द्यायचे मात्र आजचे चित्र वेगळे होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग विरोधात लागण्यासाठी सांगलीकरांनी आज एकजुटीने कर्फ्यू आल्याचे दिसून आले नेहमी गजबजलेल्या चौकात एकही पोलिस दिसून आला नाही. कुठलीही दंगल नाही कुठलाही संघटनेने पुकारलेला बंद नाही तरीही जनतेने ठरवले तर कसा करतो लागू शकतो हे सांगलीकरांनी दाखवून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100% lockdown in sangli