महापुरात 10 हजार यंत्रमाग गंजले; 100 कोटींचे नुकसान (व्हिडिओ)

महापुरात 10 हजार यंत्रमाग गंजले; 100 कोटींचे नुकसान (व्हिडिओ)

इचलकरंजी : कारखान्यात पूर ओसरल्यानंतर गुडघाभर पाणी, गंजलेले यंत्रमाग, सूत आणि बिमाचे प्रचंड नुकसान अशी अवस्था शहरातील तब्बल ६०० हून अधिक यंत्रमाग कारखान्यात होती. महापूर ओसरल्यानंतर शहरातील यंत्रमाग धारकावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे. तब्बल १० हजार यंत्रमाग १० दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली राहिल्यामुळे यंत्रमाग धारकांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे.  या महापुराने तब्बल १०० कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे शहरातील गावभाग जुना चंदुर रोड यासह मोठा परिसर पुराच्या पाण्याखाली वेढला गेला. तब्बल ७ फुटापासून १० फुटापर्यंतची पाण्याची पातळी या कारखान्यांमध्ये राहिली. त्यामुळे बहुतांशी यंत्रमाग कारखान्यातील यंत्रमाग पूर्णपणे पाण्याखाली होते. आठ दिवसांत अधिक काळ पाण्याखाली गेल्यामुळे पूर्णपणे गंजून गेले आहेत. पुराचा अंदाज न आल्यामुळे अनेक यंत्रमागधारकांनी कारखान्यासाठी लागणार असून तसेच तयार झालेले कापड त्या ठिकाणी ठेवले होते. मात्र पुरात वाढलेल्या पाण्यामुळे हे संपूर्ण साहित्य पूर्णपणे भिजून गेले आहे.


महापूर काळात शहरातील ४० ते ५० हजार यंत्रमाग बंद होते. या काळात शहरातील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले. दररोज १० लाख मीटरपेक्षा अधिक तयार होणारी कापडनिर्मिती सुमारे १५ दिवस ठप्प झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बहुतांश यंत्रमाग गंजलेल्या अवस्थेत आहेत. यंत्रमागांच्या विद्युत मोटारीही पूर्णपणे नादुरुस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर विद्युतीकरणाचही मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे हेच मोठे आव्हान बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com