सोलापूरच्या १०७ नगरसेवकाना प्रत्येकी सहा लाख 

Rupee
Rupee

सोलापूर - महापालिकेतील सर्व 107 नगरसेवकांना प्रभाग विकासासाठी प्रत्येकी सहा लाख रुपये उपलब्ध करून देण्याची शिफारस प्रशासकीय अंदाजपत्रकात
करण्यात आली आहे. त्यासाठी 6 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेचा हिस्सा 50 कोटींचा
अपेक्षित धरण्यात आला आहे. 

स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भोसले यांच्या मंजुरीने मुख्य लेखापाल शिरीष धनवे, बाबू यनगंदूल आणि
फारूक पटणी यांनी 2019-20 साठीचे अंदाजपत्रक नगरसचिवांकडे सादर केले आहे. हे अंदाजपत्रक तयार करतेवेळी महापालिकेची आर्थिक बाजू भक्कम बनवून आर्थिक
स्वावलंबन साध्य करणे या दृष्टीने तसेच महापालिकेला देय असलेल्या रकमा वेळेवर भागवणे, शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे
यासाठी प्रयत्न केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सोलापूर शहरातील कर दात्यांच्या क्रयशक्तीच्या मर्यादा विचारात घेऊन उत्पन्न वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे व महापालिकेवर असलेल्या प्रचंड खर्चाचा
डोलारा सांभाळावा लागत असल्याने वस्तुस्थितीजन्य व परिस्थितीजन्य अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शहरास स्वच्छ, सुंदर बनवून लौकीक प्राप्त करण्याचा
प्रयत्न अंदाजपत्रक सादर करताना पहिल्यांदाच करण्यात आल्याचे दिसून येते. नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास शहराचे भवितव्य उज्ज्वल आहे, असा दावाही या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. 

अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्ये
- पहिल्यांदाच नॅम पद्धतीचा वापर
- काही लेखाशीर्षांचे एकत्रिकरण व विलगीकरण
- अनावश्यक लेखाशीर्षे केली कमी
- आर्थिक स्थिती तत्काळ समजणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com