जिल्ह्यात 108 कोरोनामुक्त; 673 जणांवर उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

108 corona-free in the district; Treatment on 673 people

जिल्ह्यात आज 108 जण कोरोनामुक्त झालेत. दिवसात 53 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत बाधितांची आकडेवारी कमी होत आहे.

जिल्ह्यात 108 कोरोनामुक्त; 673 जणांवर उपचार

सांगली : जिल्ह्यात आज 108 जण कोरोनामुक्त झालेत. दिवसात 53 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत बाधितांची आकडेवारी कमी होत आहे. महापालिका क्षेत्रात 11 जण बाधित आढळले. एकूण बाधित 45 हजार 913 झाले. 673 जणांवर उपचार सुरु आहेत. सांगलीतील एकाचा आज मृत्यू झाला. 

दिवसभरात 171 आरटीपीसीआर तपासण्यात 16 बाधित आढळले. 1635 रॅपीड अँटिजेन तपासण्यात 39 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आटपाडी तालुक्‍यात 4, जतला 10, कडेगाव 4, कवठेमहांकाळ 1, खानापूर 2, मिरज 8, पलूस3, शिराळा 2, तासगाव 1 तर वाळवा तालुक्‍यात 7 जणांना बाधा झाली.

महापालिका क्षेत्रात नवे 11 रुग्ण सापडलेत. सांगलीत 6 आणि मिरजेत 5 रुग्ण आढळले. 72 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. नॉन इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर 15, हायफ्लो नेझल ऑक्‍सिजनवर 9 रुग्ण आहेत. 

आजचे बाधित ः 53 
उपचाराखाली ः 673 
बरे झालेले ः 43569 
एकूण मृत्यू ः 1671 
एकूण बाधित ः 45913 
चिंताजनक ः 98 
ग्रामीण बाधित ः 22979 
शहरी बाधित ः 6787 
मनपा क्षेत्र ः 16147 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image
go to top