साॅलीसीटर गुलाबराव शेळके यांच्या जंयतीनिमित्त ११ हजार झांडाचे वृक्षारोपण 

सनी सोनावळे
रविवार, 10 जून 2018

टाकळी ढोकेश्वर : महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते साॅलीसीटर गुलाबराव शेळके यांच्या 77 व्या जंयतीनिमित्त पिंपरी जलसेन(ता.पारनेर)येथे ११ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

पिंपरी जलसेन ग्रामपंचायत व  लोकसहभागाने हा अनोखा उपक्रम पार पडला.यावेळी बँकेचे अध्यक्ष अॅड.उदय शेळके, सभापती प्रशांत गायकवाड, अण्णा बढे, सरपंच शिवाजी औटी, विलास शेंडकर, संतोष काटे उपस्थित होते. यावेळी बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात व स्व.साॅ.गुलाबराव शेळके शक्तीस्थळ परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात  स्व.शेळकेंच्या कार्याचा गौरव केला. शेळके यांना शेतकऱ्यांनप्रती प्रेम व त्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी तळमळ होती. यामुळे शेतकरी व त्यांचे एक वेगळे नाते तयार झाले त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Web Title: 11 thousand tree plantation on the occasion of solicitor gulabrao shelke's birth anniversary