कोल्हापुरात म्हाडाची ११२ घरे

ओंकार धर्माधिकारी
शुक्रवार, 15 जून 2018

कोल्हापूर - शहरामध्ये महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुढील वर्षभरात ११२ सदनिका बांधण्यात येणार आहेत. सुभाषनगर रिंग रोड, एसएससी बोर्ड, बापूराम नगर जवळ, मोरेवाडी या चार ठिकाणी या सदनिका होणार असून त्या अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. 

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्या वतीने कमी दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. सध्या शहरामध्ये म्हाडाचे चार प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामध्ये सुभाषनगर रिंग रोड, एस.एस.सी बोर्ड, बापूरामनगरातील पोद्दार शाळेजवळ, मोरेवाडी या चार ठिकाणी म्हाडाच्या इमारती होणार आहेत. 

अल्प, अत्यल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी या सदनिका आहेत. या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून तांत्रिक मान्यतेसाठी म्हाडाच्या पुणे कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. तांत्रिक मान्यता मिळून नोव्हेंबर अखेर कामाला प्रारंभ होईल. त्यानंतर वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण होऊन त्याची सोडत काढली जाईल. 

असे आहेत प्रकल्प 
ठिकाण                अत्यल्प       अल्प       मध्यम          एकूण सदनिका 

सुभाषनगर                -            -            १२             १२
एस.एस.सी. बोर्ड         ५                         ५             १०
बापूरामनगर                -          ३३            ९           ४२
मोरेवाडी                   -          ३६          १२           ४८
एकूण                                                              ११२

कोल्हापूर शहरातील म्हाडाच्या चार प्रकल्पांचे प्रस्ताव मुंबईत पाठविले आहेत. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, ती लवकरच मिळेल अशी आशा आहे. हे प्रकल्प खूप छोटे असून त्यांना मंजुरी मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. 
- समरजीतसिंह घाटगे, अध्यक्ष, म्हाडा (पुणे )

शहरातील म्हाडाच्या चारही प्रकल्पांचे आराखडे तयार असून  प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. लवकरच तांत्रिक मान्यता मिळाली की या प्रकल्पांच्या कामाला सुरुवात होईल. मोरेवाडी येथील प्रकल्पाचा प्रस्ताव परवानगीसाठी कोल्हापूर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे पाठवला आहे. यासर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून नोव्हेंबर अखेर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. 
- अशोक पाटील (उप अभियंता, म्हाडा) 

Web Title: 112 mhada home in kolhapur