राज्य पुरस्कारासाठी 1164 गुरुजींचे अर्ज 

संतोष सिरसट
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सोलापूर - शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार दिले जातात. 2017-18 या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा, यासाठी राज्यातील एक हजार 164 गुरुजींनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्यात प्राथमिक विभागात मुंबईने, तर माध्यमिक विभागात पुणे जिल्ह्यातील गुरुजींनी बाजी मारली आहे. 

सोलापूर - शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार दिले जातात. 2017-18 या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा, यासाठी राज्यातील एक हजार 164 गुरुजींनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्यात प्राथमिक विभागात मुंबईने, तर माध्यमिक विभागात पुणे जिल्ह्यातील गुरुजींनी बाजी मारली आहे. 

स्वत-ला झोकून देऊन काम करणाऱ्या गुरुजींमुळेच राज्याचा, देशाचा व पर्यायाने समाजाचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या गुरुजींना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यापूर्वी हे पुरस्कार देण्यासाठी लेखी स्वरूपात अर्ज करावे लागत होते. मात्र, त्यामध्ये वशिलेबाजी होत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा निर्णय झाला आहे. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागांसाठी हे पुरस्कार दिले जातात. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागांतून गुरुजींनी अर्ज केले आहेत. 

गुरुजींनी केलेल्या अर्जांची स्थिती 
प्राथमिक विभागासाठी 571, माध्यमिक विभागासाठी 490, तर सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारासाठी 103 गुरुजींनी अर्ज केले आहेत. प्राथमिक विभागासाठी मुंबई येथून सर्वाधिक 33 गुरुजींनी, तर सर्वांत कमी तीन अर्ज गडचिरोलीतून आले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागासाठी पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 43 गुरुजींनी अर्ज केले आहेत. यासाठी पालघर जिल्ह्यातून एकाही गुरुजींनी अर्ज केला नाही. 

आजपासून मुलाखती 
ज्या गुरुजींनी पुरस्कारासाठी अर्ज केला आहे, त्यांच्या मुलाखती उद्यापासून (ता. 1 ऑगस्ट) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे याठिकाणी होणार आहेत. या विभागनिहाय मुलाखती नऊ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. त्यात पुरस्कारासाठी पात्र गुरुजींची निवड होणार आहे.

Web Title: 1164 Teachers application for the state award