पुसेगावमध्ये बारा जोडपी विवाहबद्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पुसेगाव - सामुदायिक विवाह उपक्रमाद्वारे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व धर्मादाय आयुक्त कार्यालयाने बारा वधूंचे कन्यादान करून त्यांच्या संसार उभारणीत हातभार लावला. आई-वडील नसलेल्या वेळेवाडी सुखेड (ता. खंडाळा) येथील वैष्णवी रामचंद्र धायगुडे व तिच्या नातेवाईकांनी ट्रस्टच्या विधायक उपक्रमास धन्यवाद दिले.

विवाह सोहळ्यात खटाव, माण, फलटण, खंडाळा, वाई, जावळी, माळशिरस, कुपवाड व शिराळा तालुक्‍यांतील वधू-वरांचे विवाह लावले. सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव यांचे सहायक धर्मादाय आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी कौतुक केले. 

हा विवाह सोहळा आमदार जयकुमार गोरे, पोलिस उपअधीक्षक काळे, सुरेंद्र गुदगे, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, शामराव जाधव, बाळासाहेब जाधव, जगनशेठ जाधव, गुलाबराव वाघ, कृष्णात जाधव, तुषार जगदाळे, मानाजी घाडगे, ॲड. सुकटे, ॲड. कुंभार व येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

या सामुदायिक विवाह सोहळ्यात बारा गोरगरीब जोडपी हिंदू धार्मिक पद्धतीने विवाहबद्ध झाली. प्रारंभी हुंडाबंदी व लेक वाचवा शपथ ग्रहण सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यातील वधू- वरांना सेवागिरी ट्रस्टतर्फे 
संपूर्ण पोषाख व संसारोपयोगी भांड्यांचा सेट सप्रेम भेट दिला. विवाह सोहळ्यानिमित्त भोजनाची सोय केली होती. लग्नानंतर २१ दिवसांच्या आत वर पक्षाला सेवागिरी मंदिर कार्यालयातून विवाहाचा दाखला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: 12 couple community marriage