आंब्याचा रस खाल्याने 12 जणांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

पारनेर : वडनेर बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील 11 जणांना आंब्याचा रस खाल्याने विषबाधा झाली. या सर्वांना पारनेर येथील ग्रामिण रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर  दोन दिवसापुर्वी ऊपचार करूण त्यांना घरी सोडण्याच आले होते. मात्र घरी गेल्यावर पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने कालपासून(ता. 15) त्यांना पुन्हा रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

वडनेर येथील निचित कुटुंबातील जणांना सोमवारी (ता.15) सायंकाळी घरी केलेल्या आंब्याचा रस खाल्याने रात्री जुलाब व उलट्या असा त्रास सुरू झाला. खूपच जास्त त्रास सुरू झाल्याने त्यांना मंगळवारी 108 या रूग्णवाहीकेतून डॉ. नरेंद्र मुळे यांच्या निगराणी खाली पारनेर ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले. त्यात बाळू निचित यांच्या सह त्यांच्याच घरातील  पुजा, सोमनाथ, सुनिता, तुषार, ज्योती, अदिना , सचिन, विनायक, शुभम, शामल या 11 जनांना व मित्र  म्हणून जेवणासाठी आलेल्या व अक्षय वाजे अशा 12 जणांना घरी केलेल्या आंब्याचा रस खाल्याने त्रास झाला होता.

संध्याकाळी रस खाल्याने त्यांना अचानक रात्री खूप त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रूग्णवाहिकेतून पारनेर येथे ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा शुक्रवारी  रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्यावर डॉ. मनिषा ऊंद्रे, डॉ. प्रतिभा दिघे व डॉ. अभिलाषा शिंदे आदी डॉक्टर उपचार करत आहेत. आता सर्वांची प्रकृती सुधारत आहे. 

अन्नातून विष बाधा झाळ्यानंतर रूग्णांच्या आताड्यांना सुज येते तसेच या रूग्णांबाबत झाला आहे. सध्या ऊपचार सुरू आहेत व सर्वांचीच प्रकृती सुधारत आहे. मात्र किमान सात ते आठ दिवस त्यांना खाण्या बाबत कडक पथ्य पाळवी लागतील तरच त्यांना लवकर आराम मिळेल. आंबे पाऊस झाल्यानंतर खाणे टाळले पाहीजे. तसेही अनेकांना आंबे खाल्यानंतर त्रास होत असतो. आता पाऊस झाला आहे त्यामुळे आंबे खाणे टाळावे किंवा चांगले खात्रीशिर पाहून खावेत
- डॉ. अभिलाषा शिंदे. वैध्यकिय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय पारनेर.
 
Web Title: 12 people have been poisoned by eating mangoes

टॅग्स