कोपर्डे हवेलीतील बारा जणांचा तडीपारीचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोपर्डे हवेलीसह परिसरातील सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोपर्डे हवेली येथील बारा जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तालुका पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. संबंधित बारा जणांना नोटीस बजावत आपल्याला तडीपार का करण्यात येऊ नये ? अशी विचारणा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख याबाबत निर्णय घेणार आहेत.

कऱ्हाड  ः कोपर्डे हवेलीसह परिसरातील सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोपर्डे हवेली येथील बारा जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तालुका पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. संबंधित बारा जणांना नोटीस बजावत आपल्याला तडीपार का करण्यात येऊ नये ? अशी विचारणा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख याबाबत निर्णय घेणार आहेत.
 
कोपर्डे हवेली व परिसरात गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत आहेत. मारामारी व इतर कारणांनी कोपर्डे हवेलीसह परिसरातील सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. वारंवार समज देऊनही काही युवकांनी गुन्हेगारीमध्ये आघाडीच घेतल्याचे दिसत आहे.

मध्यंतरी तर कोपर्डे हवेली येथे भर चौकात एकावर कोयत्याने वार करण्यात आले होते. यामध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली होती. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर संशयीतांना कळंबा जेलमध्ये पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, कोपर्डे हवेलीत अलीकडे वारंवार घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गावातील बारा जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठवले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित बारा जणांना नोटिसा बजावून आपल्याला तडीपार का करण्यात येऊ नये? अशी विचारणा केली आहे. संबंधितांचे म्हणणे आल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख याबाबत निर्णय घेणार आहेत.

Web Title: 12 peoples briidle Proposal in koparde haveli