बारा कारखान्यांची जिल्ह्यात धुराडी बंद

बारा कारखान्यांची जिल्ह्यात धुराडी बंद

सातारा - ऊस गळीत हंगामात जानेवारी व फेब्रुवारीत सहा सहकारी व सहा खासगी साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. अद्याप कऱ्हाड तालुक्‍यातील कृष्णा, सह्याद्री आणि साताऱ्यातील अजिंक्‍यतारा या तीन सहकारी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत सर्व १५ कारखान्यांनी ५३ लाख ६६ हजार ८६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ६४ लाख ४५६ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी १२.०४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. 

जिल्ह्यात नऊ सहकारी व सहा खासगी असे एकूण १५ साखर कारखाने असून, यावर्षी या सर्वांनीच गाळप केले आहे. ऊस कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने जानेवारी व फेब्रुवारीतच बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत बंद झाले आहे. वेळेत ऊस गेल्याने शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. सर्वच कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. आतापर्यंत सर्व साखर कारखान्यांनी मिळून ५३ लाख ६६ हजार ८६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ६४ लाख ४५६ क्विंटल साखर निर्मिती केली. सर्वाधिक साखर निर्मिती सह्याद्री साखर कारखान्याने केली आहे. सह्याद्री कारखान्याने ११ लाख ७४ हजार ४३५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे, तर साखर उताऱ्यात कृष्णा व जयवंत शुगरने आघाडी घेतली आहे. या दोघांची टक्केवारी १२.५० च्यावर राहिली आहे. अजिंक्‍यताराच्या गाळपाची उद्या (गुरुवारी) सांगता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कारखानानिहाय ऊस गाळप आणि कंसात साखर निर्मिती : श्रीराम फलटण १८५४३५ (२०२०९५), कृष्णा ८१०५७० (१०२२११०), किसन वीर कारखाना : ४०२९४७ (४५३४००), देसाई कारखाना १७२१०३ (१९६७२५), सह्याद्री ९१६७०० (११७४४३५), अजिंक्‍यतारा  ४०००२० (४६९१००), रयत कऱ्हाड २९६२६१ (३५६११०), प्रतापगड २१३६६६ (२३६५००), खंडाळा तालुका  १२५२४७ (१३०२५०), न्यू फलटण शुगर १५६५१६ (१६५४६०), जरंडेश्‍वर २८५९८२ (३४१७५०), जयवंत शुगर ३५७७६१ (४५२८००), ग्रीन पॉवर शुगर ४०८९०० (४७९८५०), स्वराज्य इंडिया २४४७४२ (२५९६७१), शरयू शुगर ३९००१० (४६०२००).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com