जिल्ह्यात 122 रूग्ण कोरोनामुक्त... नविन 113 रूग्ण : दिवसभरात 3 रूग्णांचा मृत्यू 

CORONA.jpg
CORONA.jpg

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचणीत नविन 113 रूग्ण बाधित असल्याचे आढळले. आज दिवसभरात 122 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात जिल्ह्यातील तीन रूग्णांचा मृत्यू झाला.


कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. आज देखील दिवसभरात आरटीपीसीआर चाचणीत 1086 रूग्णांची तपासणी केली असता 61 रूग्ण कोरोना बाधित आढळले. हे प्रमाण 4 टक्के इतके आहे. तर ऍन्टीजेन चाचणीत 2089 रूग्ण तपासले. त्यामध्ये 57 जण बाधित आढळले. हे प्रमाण 5 टक्के इतके आहे. आज दोन्ही तपासण्यात जिल्ह्यातील 113 आणि परजिल्ह्यातील 5 रूग्ण आढळले. 

जिल्ह्यातील 113 रूग्णांमध्ये वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक 25 रूग्ण आढळले. तसेच आटपाडी तालुक्‍यातील 6, जत 3, कडेगाव 8, कवठेमहांकाळ 11, खानापूर 14, मिरज 5, पलूस 3, शिराळा 11, तासगाव 3 आणि महापालिका क्षेत्रात 14 रूग्ण आढळले. महापालिका क्षेत्रातील रूग्णांमध्ये सांगलीतील 11 आणि मिरजेत 3 जणांचा समावेश आहे. 
आज दिवसभरात तासगाव तालुक्‍यातील दोन आणि शिराळा तालुक्‍यातील एक अशा तीन रूग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 122 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या 1868 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 212 रूग्ण चिंताजनक आहेत. 174 रूग्ण ऑक्‍सिजनवर आणि 38 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 
 

जिल्ह्यातील चित्र 

  • आजअखेर बाधित रूग्ण- 44868 
  • उपचार घेणारे रूग्ण- 1868 
  • आजअखेर बरे रूग्ण- 41369 
  • जिल्ह्यातील मृत रूग्ण- 1631 
  • परजिल्ह्यातील मृत- 206 
  • बाधितपैकी चिंताजनक- 212 
  • आजअखेर ग्रामीण रूग्ण- 22252 
  • आजअखेर शहरी रूग्ण- 6620 
  • महापालिका क्षेत्र रूग्ण- 15996 

कोरोना तालुकानिहाय 

  • आटपाडी - 2153 
  • जत - 1890 
  • कडेगाव - 2655 
  • कवठेमहांकाळ - 2325 
  • खानापूर - 2567 
  • मिरज - 4317 
  • पलूस - 2510 
  • शिराळा - 2164 
  • तासगाव - 3070 
  • वाळवा - 5221 
  • महापालिका - 15996 
  • एकुण = 44868 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com