कोयनेत 125 टीएमसी पाण्याची आवक 

जालिंदर सत्रे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पाटण - यंदा 23 जूनपासून पडत असलेल्या पावसास काल (ता. 22) दोन महिने पूर्ण झाले. दोन वेळा पाणी सोडले असून, प्रथम सात व दुसऱ्या टप्प्यात साडेसहा फुटांपर्यंत दरवाजे उचलले. जलवर्षात एकूण 125 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 

पाटण - यंदा 23 जूनपासून पडत असलेल्या पावसास काल (ता. 22) दोन महिने पूर्ण झाले. दोन वेळा पाणी सोडले असून, प्रथम सात व दुसऱ्या टप्प्यात साडेसहा फुटांपर्यंत दरवाजे उचलले. जलवर्षात एकूण 125 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 

पाणीसाठा नियंत्रणासाठी पायथा वीजगृहातून 33, सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून 17 दिवसांमध्ये एकूण 41.72 टीएमसी आणि वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापरलेले 8.57 टीएमसी असा एकूण 50 टीएमसी पाण्याचा वापर तीन महिन्यांत झाला. 105.25 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरणात 103.08 टीएमसी पाणीसाठा व पाणीपातळी 2161.10 फूट नोंदली गेलेली आहे. एक जून रोजी धरणात 29.40 टीएमसी व प्रत्यक्ष 23 जूनला पाऊस सुरू झाला, त्या वेळी 26 टीएमसी पाणीसाठा होता. पाणीसाठा 77.92 टीएमसी असताना धरण व्यवस्थापनाने 17 जुलै रोजी प्रथम पायथा वीजगृह व सहा वक्र दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू केला. नऊ दिवस सांडव्यावरून 12.66 टीएमसी व 15 दिवस पायथा वीजगृहातून 1.53 टीएमसी पाणी कोयना नदीत सोडण्यात आले. या कालावधीत सात फुटांपर्यंत दरवाजे उचलले. 24 जुलैनंतर पावासाचा जोर कमी झाला. मात्र, पाऊस थांबलेला नसल्याने पाच ऑगस्टला पायथा वीजगृहातून व पाणीसाठा 101.56 टीएमसी असताना 14 ऑगस्ट रोजी सांडव्यावरून विसर्ग करण्यास पुन्हा सुरवात केली. सातत्याने पावसाचे प्रमाण कमी- जास्त होत असल्याने धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत उचलण्यात आले. त्यामुळे 57 हजार 376 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करावा लागला. त्यात तीन वेळा मूळगाव पूल पाण्याखाली गेला. 

या जलवर्षात एक जूनपासून आजपर्यंत पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी 6.84 टीएमसी व पूर्वेकडे 1.73 टीएमसी पाण्याचा वापर पायथा वीजगृहातून करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात पायथा वीजगृहातून गेल्या 18 दिवसांत 4.07 टीएमसी व सांडव्यावरून नऊ दिवसांत 23.46 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दोन वेळा पाणी सोडल्यामुळे पायथा वीजगृहातून 33 दिवसांत 5.60 टीएमसी व सांडव्यावरून 18 दिवसांत 36.12 टीएमसी असा एकूण 41.72 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. 

पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी 6.84 टीएमसी व सिंचनासाठी 1.73 टीएमसी पाण्याचा वापर झाला. 

आकडे बोलतात... 
धरणात पाण्याची झालेली आवक - 124.99 टीएमसी 
वीजनिर्मीती, सिंचन व सोडलेले पाणी - 50.29 टीएमसी 
धरणात सध्याचा पाणीसाठा - 103 टीएमसी

Web Title: 125 TMC of water inflows in koynadam