सांगली जिल्ह्यात नवे 126 रुग्ण; 10 जणांचा मृत्यू; 429 लोक कोरोनामुक्त

126 new corona patients in Sangli district; 10 deaths; 429 people discharged
126 new corona patients in Sangli district; 10 deaths; 429 people discharged

सांगली : जिल्ह्यात आज 126 जणांना कोरोनाची बाधा झाली. 2 हजार 344 जणांची तपासणी केली होती. दोन महिन्यांत पहिल्यांदा दिवसातील बाधितांची संख्या 200 हून कमी झाली आहे. जिल्ह्यातील आठ तर परजिल्ह्यातील 2 जणांचा मृत्यू झाला. उपचाराखालील रुग्णसंख्या 2 हजार 737 असून; एकूणच रुग्णालयांवरील ताण कमी झाल्याचे चित्र आहे 

आज आरटीपीसीआर तपासण्या 876 झाल्या, त्यात 73 बाधित आढळले. अँटिजेन तपासण्या 1468 झाल्या, त्यात 54 बाधित आढळले. आटपाडी तालुक्‍यात 19, जतला 6, कडेगाव 9, कवठेमहांकाळ 4, खानापूर 8, मिरज 9, पलूस 14, तासगाव 15, वाळवा 15 तर महापालिका क्षेत्रातील 27 जणांना बाधा झाली आहे. त्यात सांगलीतील 18, तर मिरजेतील 9 जणांचा समावेश आहे.

जतमधील 1, कवठेमहांकाळमधील 1, पलूसमधील 1, शिराळ्यातील 1, तासगावमधील 3 तर महापालिका क्षेत्रातील 1 रुग्णाचा मृत्यू झाला. 341 जण ऑक्‍सिजनवर आहेत, नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर 60, हायफ्लो नेझल ऑक्‍सिजनवर 31 तर इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर 7 रुग्ण आहेत. 

परजिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे मिरजेत किंवा सांगलीत येऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आज केवळ एक रुग्ण बाधित आढळला. परजिल्ह्यातील 23 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सातारा येथील दोन जणांचा मृत्यू झाला. 

जिल्ह्यातील स्थिती 

  • आजचे बाधित ः 126 
  • उपचाराखाली ः 2737 
  • बरे झालेले ः 38545 
  • एकूण मृत्यू ः 1576 
  • एकूण बाधित ः 42858 
  • चिंताजनक ः 439 
  • ग्रामीण बाधित ः 20813 
  • शहरी बाधित ः 6283 
  • मनपा क्षेत्र ः 15762 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com