बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या

राजेश पाटील
मंगळवार, 22 जानेवारी 2019

बारावीतील विद्यार्थिनीचा गळा चिरून खून झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. करपेवाडी येथे ही घटना घडली. भाग्यश्री संतोष माने (वय 17, रा. करपेवाडी) असे संबधित विद्यार्थिनीचे नाव आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : बारावीतील विद्यार्थिनीचा गळा चिरून खून झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. करपेवाडी येथे ही घटना घडली. भाग्यश्री संतोष माने (वय 17, रा. करपेवाडी) असे संबधित युवतीचे नाव आहे.

भाग्यश्री माने तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात शिकत होती. आज ती नेहमीप्रमाणे सकाळी काॅलेजला जाते, असे सांगून घरातून गेली. मात्र, काॅलेज सुटल्यानंतर नेहमीच्या वेळेत ती घरी परतली नाही. त्यानंतर मात्र नातेवाईकांनी तिची चौकशी सुरू केली. तिच्या मैत्रीणी, महाविद्यालय, संबधित आप्तेष्ट यांच्याकडे त्यांनी चौकशी केली. मात्र, तिचा शोध लागला नाही. ती ज्या मार्गाने जाते ती शेतातील पायवाट आहे. ती करपेवाडीतून थेट तळमावलेत येते. त्या मार्गावर भाग्यश्रीची आई व आजीने शोधाशोध सुरू केला. त्यावेळी करपेवाडीनजीकच्या शेतातील रस्त्यात तिचा मृतदेह सापडला.

तिचा गळा चिरून खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी त्वरीत त्याची माहिती कुटुंबिय, ग्रामस्थ व पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तिच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. माने कुटुंबिय मुळचे कऱ्हाड तालुक्यातील कार्वे येथील आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून ते करपेवाडीत स्थायिक आहेत.

Web Title: 12th student Murder in Satara