सांगली जिल्ह्यात नवे 131 बाधित; 12 मृत्यू; दिवसभरात 272 जण कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

महापालिका क्षेत्रात 69 रुग्ण आढळले असून त्यात सांगलीत 36, तर मिरजेत 33 जणांचा समावेश आहे. 

सांगली ः जिल्ह्यात आज 131 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्ह्यातील 11 तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा समावेश. एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 हजार 443 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 83 झाली आहे. आज दिवसभरात तब्बल 272 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहे. महापालिका क्षेत्रात 69 रुग्ण आढळले असून त्यात सांगलीत 36, तर मिरजेत 33 जणांचा समावेश आहे. 

आज दिवसभरात आरटीपीसीआर तपासणी 539 झाल्या. त्यात 97 रुग्ण बाधित आढळले. रॅपिड अँटीजेन तपासण्या 191 झाल्या. त्यात 48 बाधित आढळले आहेत. आटपाडी तालुक्‍यातील 6, जत 6, कडेगाव 1, खानापूर 2, मिरज 14, पलूस 3, शिराळा 5, तासगाव 7 तर वाळवा तालुक्‍यातील 18 जण बाधित झाले. मृतांची एकूण संख्या 320 झाली. 

दुधोंडी (पलूस) येथील 58 वर्षीय महिला, विजयनगर येथील 80 वर्षाचे वृद्ध, सांगलीतील 71 वर्षीय वृद्ध, हिंगणगांव (कवठेमहाकांळ) येथील 52 वर्षीय पुरूष, मालगाव (मिरज) येथील 50 वर्षीय महिला, रांजणी (कवठेमहांकाळ) येथील 75, गावभागातील 102 वर्षाचे वृद्ध, अंकली (मिरज) येथील 99 वर्षीय वृद्ध, अंबक (कडेगाव) येथील 54 वर्षीय पुरूष, सांगलीतील 65 वर्षीय पुरूष, आझाद नगर (कडेगाव) येथील 70 वर्षीय वृद्धा यांचा आज मृत्यू झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील 55 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. आज परजिल्ह्यातील 14 रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यात कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा येथील रुग्णांचा समावेश आहे. उपचाराखाली 93 लोक आहेत. 

 

 • सांगली जिल्ह्याची स्थिती 
 • आजचे बाधित ः 131 
 • उपचाराखाली रुग्ण ः 3083 
 • बरे झालेले रुग्ण ः 5040 
 • मृत्यू झालेले रुग्ण ः 320 
 • एकूण बाधित ः 8443 
 • चिंताजनक रुग्ण ः 343 
 • ग्रामीण भागात बाधित ः 2782 
 • शहरी भागात बाधित ः 696 
 • मनपा बाधित ः 4965 
 • ... 
   
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 131 new affected in Sangli district; 12 deaths; 272 coronas released during the day